उत्तर कोरियाने ‘आयसीबीएम’च्या नव्या इंजिनाची चाचणी घेतली

‘आयसीबीएम’च्यासेऊल – आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अर्थात ‘आयसीबीएम’च्या प्रक्षेपणाची गती वाढविणाऱ्या घन-इंधन रॉकेट मोटारची उत्तर कोरियाने चाचणी केली. यामुळे अमेरिकेच्या अतिपूर्वेपर्यंत मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या वेगात सुधारणा होईल, असा दावा केला जातो. हुकूमशहा किम जाँग-उन यांच्या अध्यक्षतेखाली ही चाचणी पार पडल्याचे उत्तर कोरियाने जाहीर केले.

काही आठवड्यांपूर्वीच उत्तर कोरियाने आण्विक स्फोटके वाहून नेण्याची क्षमता असलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. यामध्ये लांब पल्ल्याच्या ‘हॉसाँग-17’ या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा समावेश होता. या चाचणीसह उत्तर कोरियाने अमेरिका व दक्षिण कोरियाला धमकावले होते. या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांसाठी वापरल्या जाणाऱ्या रॉकेट मोटारवर उत्तर कोरियाने काम सुरू केले होते. गुरुवारी उत्तर कोरियाच्या सोहेई प्रक्षेपण तळावर ही चाचणी पार पडली.

या चाचणीमुळे उत्तर कोरियाच्या ताफ्यातील आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या गतीत वाढ होऊ शकतो. त्यामुळे शत्रूच्या ठिकाणांवर हल्ले चढविण्याच्या वेळेवर फरक पडू शकतो, याकडे लष्करी विश्लेषक लक्ष वेधत आहेत. या चाचणीद्वारे उत्तर कोरियाने अमेरिका व दक्षिण कोरियाला धमकी दिल्याचे दिसत आहे.

leave a reply