जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या ७५ लाखांवर

वॉशिंग्टन – जगभरात कोरोनाच्या साथीचा संसर्ग झालेल्यांमध्ये सातत्याने भर पडत असून ही संख्या ७५ लाखांवर जाऊन पोहोचली आहे. कोरोनाव्हायरसमुळे बळी गेलेल्यांची संख्या ४ लाख २० हजारांवर गेली आहे. अमेरिका व ब्राझीलपाठोपाठ आता रशियामध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून ती पाच लाखांवर गेली आहे. त्याचवेळी गेल्या २४ तासांमध्ये पावणे दोन लाखांहून अधिक रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनाबाधितांची संख्या, कोरोनाबाधित, कोरोना

‘वर्ल्डओमीटर’ या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७५,२०,२६२ झाली असून गेल्या २४ तासांमध्ये त्यात १,५१,०५३ जणांची भर पडली आहे. कोरोनाच्या साथीमुळे २४ तासात ५,७३० जण दगावले असून एकूण बळींची संख्या ४,२०,५८३ वर पोहोचली आहे. कोरोनाच्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८,१८,७३८ झाली असून २४ तासांमध्ये त्यात १,८१,५०८ जणांची वाढ झाली आहे.

कोरोनाबाधितांची संख्या, कोरोनाबाधित, कोरोना

अमेरिकेत २३,५०० रुग्णांची भर पडली असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या २०,७२,७५१ झाली आहे. साथीत बळी गेलेल्यांची एकूण संख्या १,१५,३०४ झाली असून २४ तासात त्यात १,०२७ जणांची भर पडली. ब्राझिलमध्ये बळींची एकूण संख्या ३९,८०३ झाली असून २४ तासांमध्ये १,२७४ जण दगावले आहेत. रशियात ८,४०४ नव्या रुग्णांची भर पडली असून कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या ५,०२,४३६ झाली आहे. रशियात गेल्या २४ तासांमध्ये २१६ बळी गेले असून कोरोना साथीमुळे दगावलेल्यांची एकूण संख्या ६,५३२ झाली आहे.

जगभरात एक लाखांहुन अधिक कोरोनाचे रुग्ण असलेल्या देशांची संख्या १६ वर गेली असून या आठवड्यात त्यात पाकिस्तान व सौदी अरेबिया या दोन देशांची भर पडली आहे. त्याचवेळी कोरोना साथीवर नियंत्रण मिळविल्याचा दावा करणाऱ्या दक्षिण कोरियात गेले १० दिवस सातत्याने नवी प्रकरणे समोर येत असून कोरोनाच्या साथीची नवी लाट आल्याची भीती व्यक्त होत आहे.

leave a reply