डीआर काँगोमधील पुरात चारशेहून अधिक बळी

किंशासा – मध्य आफ्रिकेतील डीआर काँगोला झोडपलेल्या पूराने ४०० हून अधिक जणांचा बळी घेतला आहे. या भागातील पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहणार आहे. त्यामुळे येथील जीवितहानी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. काही दिवसांपूर्वी शेजारच्या रवांडा या देशात आलेल्या पूराचा फटका डीआर काँगोला बसल्याचा दावा केला जातो.

युरोपिय महासंघ चीनविरोधात बचाव करण्यात सक्षम नाही - इटलीच्या माजी पंतप्रधानांचा दावाडेमोक्रॅटिक रिपब्लिक काँगो अर्थात डीआर काँगोच्या ‘साऊथ किवू’ प्रांताला सलग दोन आठवडे पावसाने झोपडले आहे. यामुळे येथील नद्यांचे बांध मोडून दोन गावांमध्ये पाणी शिरले. या पूरात व त्यानंतर दरड कोसळल्यामुळे एकूण २८७ जणांचा बळी गेला असून त्यांचे मृतदेह सापडले आहेत. तर १७६ जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय २०५ जण जखमी झाले असून यातील काहींची परिस्थिती गंभीर असल्याचा दावा केला जातो.

राष्ट्राध्यक्ष फेलिक्स शिसेकेदी यांनी मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारणासाठी तातडीने पावले उचलली आहेत. पण साऊथ किवू प्रांतातील पूरस्थिती मे महिन्याच्या अखेरीपर्यंत कायम राहणार असल्याचे बोलले जाते. येथील पावसाचा जोर कायम असून किवू सरोवर तुडूंब भरुन वाहत आहे. आठवड्यापूर्वी शेजारच्या रवांडाच्या सीमेवरील गावात किवू सरोवराचे पाणी शिरल्यामुळे १३१ जणांचा बळी गेला होता. यामध्ये हजारो घरांचे नुकसान झाले होते. या सरोवराच्या दुसऱ्या किनाऱ्यावर असलेल्या डीआर काँगोलाही दोन दिवसानंतर पूराचा फटका बसला.

दरम्यान, डीआर काँगोच्या पूर्वेकडील सीमाभाग याआधीच बंडखोर आणि दहशतवादी संघटनांमुळे अस्थिर झाला आहे. या भागात सैन्य घुसविण्यावर दक्षिण आफ्रिकेतील काही देश विचार करीत आहेत.

हिंदी

 

leave a reply