युरोपात कोरोनाचे एक लाखाहून अधिक बळी

अमेरिकेतील बळींची संख्या ४० हजारांवर

लंडन/वॉशिंग्टन – कोरोनाव्हायरसने जगभर हाहाकार माजविलेला असताना, युरोपमध्ये या साथीचे एक लाखाहून अधिक बळी गेले आहेत. युरोपमधील इटली, स्पेन, फ्रान्स आणि ब्रिटन या चार देशांमध्ये प्रत्येकी पंधरा हजाराहून अधिक जण दगावले आहेत. तर एकट्या अमेरिकेत या साथीने ४० हजाराहून अधिक जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने दिली.

गेल्या चोवीस तासात या साथीने अमेरिकेत सर्वाधिक, १९०३ जणांचा बळी घेतला आहे. तर अमेरिकेतील या साथीची लागण झालेल्यांची संख्या साडे सात लाखाहून अधिक झाली आहे. शनिवारी या साथीचे अमेरिकेत २८,४८६ नवे रुग्ण आढळले. गेल्या आठवड्याभरानंतर पहिल्यांदा अमेरिकेतील या साथीत दगावलेल्यांची संख्येत घट झाल्याचा दावा अमेरिकी माध्यमे करीत आहेत. व्हाईट हाऊसने देखील अमेरिकेतील लॉकडाउनचे नियम काही प्रमाणात शिथिल करण्याची घोषणा केली आहे.

या साथीने युरोपमध्ये आतापर्यंत एक लाखाहून अधिक जणांचा बळी गेला आहे. युरोपिय महासंघाने ही माहिती दिली. यापैकी इटलीमध्ये २३,६६०, स्पेनमध्ये २०,४५३, फ्रान्समध्ये १९,७१८ तर ब्रिटनमध्ये १६,०६० जणांनी या साथीत आपले प्राण गमावले आहेत. या व्यतिरिक्त बेल्जियममध्ये ५,६८३, जर्मनीत ४,५४७, नेदरलँड ३,६८४ तर स्वित्झरलँडमध्ये १,३९३ बळींची नोंद झाली. युरोपमधील या साथीच्या एकूण रुग्णांची संख्या ११,२३,२८५ वर गेली आहे.

leave a reply