पाकिस्तान अण्वस्त्रांबाबत तडजोड करणार नाही

- पंतप्रधान व अर्थमंत्र्यांची ग्वाही

इस्लामाबाद – जनतेची उपासमार झाली तरी अण्वस्त्रांबाबत पाकिस्तान तडजोड करणार नाही, अशी घोषणा या देशाचे नेते करीत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पाकिस्तानला कर्जसहाय्य पुरविण्यास तयार नाही, त्याचे कारण आंतरराष्ट्रीय शक्तींना पाकिस्तानकडून अण्वस्त्रे काढून घ्यायची आहेत, असे दावे पाकिस्तानात केले जातात. त्यासाठी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची दैना उडविण्यात आल्याचा समज पाकिस्तानमध्ये रूढ होऊ लागला आहे. मात्र काहीही झाले तरी पाकिस्तान अण्वस्त्रांबाबत तडजोड करणार नाही, अशी ग्वाही या देशाचे पंतप्रधान तसेच अर्थमंत्र्यांनी दिली.

पाकिस्तान अण्वस्त्रांबाबत तडजोड करणार नाही - पंतप्रधान व अर्थमंत्र्यांची ग्वाहीआत्तापर्यंत 23 वेळा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेणाऱ्या पाकिस्तानने नाणेनिधीच्या सूचनांचे पालन केले नव्हते. यावेळीही नाणेनिधी आधीच्या बेपर्वाईकडे दुर्लक्ष करून आपल्याला कर्ज पुरविल, अशी पाकिस्तानची अपेक्षा होती. मात्र नाणेनिधीने आपल्या शर्ती पूर्ण केल्याखेरीज कर्ज मिळणार नाही, असे पाकिस्तानला बजावले आहे. त्यातच पाकिस्तानातील राजकीय अस्थैर्यामुळे नाणेनिधी कर्ज देताना अधिक सावधपणा दाखवित असल्याचे दिसते. पण आपल्याला कर्जसहाय्य मिळण्यास होणारा हा विलंब म्हणजे पाकिस्तानच्या विरोधात कारस्थानाचा भाग असल्याचा समज या देशात रूढ होऊ लागला आहे.

आंतरराष्ट्रीय शक्तींना पाकिस्तानची अण्वस्त्रे काढून घ्यायची आहे. यासाठी त्यांनी आधी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची दैना उडविली व आता सहाय्य करण्यास नकार देत आहेत, असे दावे पाकिस्तानातील काही विश्लेषक व पत्रकार करीत आहेत. इतकेच नाही तर सध्याचे सरकार आंतरराष्ट्रीय शक्तींच्या दबावाखाली येऊन देशाची अण्वस्त्रे त्यांच्याकडे सोपवतील, असे आरोप पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्यांवरून केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान पिपल्स पार्टी या सत्ताधारी पक्षाच्या आघाडीत सहभागी झालेल्या एका संसद सदस्याने यासंदर्भात आपल्या सरकारला विचारणा केली. त्याला उत्तर देताना पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी काहीही झाले तरी अण्वस्त्रांच्या आघाडीवर तडजोड करणार नाही, असे आश्वासन दिले. त्याच्या पाठोपाठ पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देखील पाकिस्तान आपल्या अण्वस्त्रांचे अतिशय सावधपणे संरक्षण करीत असल्याचे सांगून ती सुरक्षित असल्याची ग्वाही दिली. अशारितीने या दोन्ही नेत्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर पाकिस्तानातील काहीजणांचा संशय अधिकच बळावल्याचे दिसत आहे.

पाकिस्तान अण्वस्त्रांबाबत तडजोड करणार नाही - पंतप्रधान व अर्थमंत्र्यांची ग्वाहीपाकिस्तान अण्वस्त्रांबाबत तडजोड करणार नाही, हे सांगण्याची वेळच का येते? असा सवाल या पत्रकारांनी केला आहे. पाकिस्तानचे नेते वारंवार हे ठासून सांगत आहेत, याचाच अर्थ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून अण्वस्त्रांबाबत पाकिस्तानवर दडपण टाकले जात आहे, असा होत असल्याची चिंता या पत्रकारांनी व्यक्त केली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय दडपण सहन करण्याची क्षमता पाकिस्तानच्या नेत्यांकडे नाही, ते दडपणाखाली येऊन अण्वस्त्रांबाबत तडजोड करतील, अशी चिंता देखील या पत्रकारांनी व्यक्त केली आहे. मात्र पाकिस्तानचे लष्कर तसे होऊ देणार नाही, असे या पत्रकारांचे म्हणणे आहे.

अण्वस्त्रांमुळेच पाकिस्तान आजवर भारतापासून सुरक्षित राहिला, अन्यथा आपल्या प्रचंड लष्करी ताकदीच्या बळावर भारताने पाकिस्तानचा घास गिळला असता, असे या देशातील काही बुद्धिमंतांपासून ते सर्वसामान्य नागरिकांनाही वाटत आहे. म्हणूनच भारत इतर प्रमुख देशांबरोबर कारस्थान करून पाकिस्तानची अण्वस्त्रे काढून घेण्याच्या तयारीत असल्याची भीती या देशाच्या माध्यमांनाही वाटते आहे. याच कारणामुळे जनतेची उपासमार होत असताना देखील भयगंडाने पछाडलेला पाकिस्तान अण्वस्त्रांबाबत तडजोड करणार नाही, असा आरडाओरडा करीत आहे. मात्र जगण्यासाठी अन्न नसताना, अण्वस्त्रे राखून देशाची सुरक्षा कशी करती येईल? असा मुलभूत प्रश्न या देशातील उपासमारीची झळ बसणारे सर्वसामान्य विचारत आहेत.

हिंदी

 

leave a reply