युएईला रशियाच्या विरोधात न जाण्याची शिक्षा

- एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट केले

रशियाच्या विरोधातपॅरिस – ‘फायनॅन्शिअल ऍक्शन टास्क फोर्स-एफएटीएफ’ने पैशांच्या गैरव्यवहारांचा आरोप करून युएईला ‘ग्रे लिस्ट’मध्ये सामील केले. एफएटीएफच्या तीन सदस्यांनी युएईच्या विरोधात मतदान केल्यामुळे ही कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे. संयुक्त राष्ट्रसंघात युक्रेनवरील हल्ल्यावरून रशियाच्या विरोधात मतदान करण्याचे नाकारल्याने युएईवर ही कारवाई झाली असून यामागे अमेरिका असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

सौदी अरेबियाप्रमाणे युएईचेही अमेरिकेबरोबरील संबंध ताणलेले आहेत. अमेरिका इराणबरोबर करीत असलेला अणुकरार व युएईवर हल्ला चढविणार्‍या येमेनी बंडखोरांना अमेरिकेचे छुपे समर्थन, यामुळे युएई अमेरिकेवर नाराज आहे. अशा परिस्थितीत, अमेरिकेची पर्वा न करता युएईने संयुक्त राष्ट्रसंघात रशियाविरोधी ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचे टाळून तटस्थ भूमिका स्वीकारली होती.

दोन आठवड्यांपूर्वी इंधन आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन वाढवून युरोपिय देशांना त्याचा पुरवठा करण्याची मागणी अमेरिकेने युएईकड केली होती. त्याला युएईने नकार दिल्याचे वृत्त आहे. त्यानंतर एफएटीएफच्या यादीत युएईचा समावेश झालेला आहे, ही लक्षणीय बाब ठरते. यानुसार एफएटीएफने शुक्रवारी युएईसमोर २३ मागण्यांवर अंमलबजावणीची सूचना केली आहे. युएईने याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

leave a reply