गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी रेल्वेची तयारी

नवी दिल्ली, दि. २८ – देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून पुढील काही दिवसात हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर परिस्थितीला तोंड देण्यासाठी रेल्वेचे डबे आयसीयू, क्वारंटाईन वार्ड आणि आयसोलेशन सेंटरमध्ये बदलण्यात येत आहेत.  रुग्णालयाची कमतरता असणाऱ्या भागात हे कोचेस पुरवण्यात येणार आहेत. 

अमेरिका, इटलीसह अन्य काही देशात कोरोना साथीची लागण झालेल्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या या देशांमधील परिस्थिती भयावह आहे. देशातील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या ९५० वर पोहोचली आहे. या देशांप्रमाणे भारतात देखील रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास रुग्णालये कमी पडण्याची शक्यता असून आरोग्य सेवेवर ताण पडेल. त्यामुळे रल्वेचे कोचेस वॉर्डमध्ये बदलण्यात येत आहेत.
या बरोबर डॉक्टर, नर्स साठी देखील व्यवस्था करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर या विलगीकरण कक्षांचा वापर झाल्यानंतर प्रत्येक रेल्वे विभागाकडून दर आठवड्याला १० कोचची निर्मिती केली जाईल, असं रेल्वेने स्पष्ट केले आहे.   रेल्वेकडून तयार करण्यात आलेली ही विलगीकरण सुविधा देशातील ज्या भागात रुग्णालयांची कमतरता असेल  त्या भागाला पुरवली जाईल असे सांगण्यात येत आहे.
 तसेच रेल्वेकडून वैद्यकीय सुविधांसाठी २२० व्होल्टची इलेक्ट्रिसिटीही दिली जाणार आहे. प्रत्येक कोचमध्ये शेवटच्या पार्टिशनमधून दरवाजा काढण्यात आला आहे. तसंच प्रत्येक कोचच्या शेवटी टॉयलेटचं रुपांतर बाथरूममध्ये कऱण्यात आलं आहे.
पश्चिम रेल्वेकडून वर्कशॉपमध्ये 28 डब्यात  प्रायोगिक स्वरुपातील आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. गरज पडल्यास असे 3 लाख आयसोलेशन बेड तयार करण्यात येतील .

leave a reply