पाश्चिमात्य देशांनी निर्बंध लादल्यानंतर देखील रशियाचा जगातील दहा आघाडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये समावेश

मॉस्को – रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य देश रशियावर एकापाठोपाठ एक निर्बंधांचा मारा करीत आहेत. या निर्बंधांमुळे रशियाची अर्थव्यवस्था खिळखिळी होऊन रशियन राजवट युक्रेनमधील हल्ले थांबविल, असा दावा पाश्चिमात्य देश करीत होते. मात्र प्रत्यक्षात पाश्चिमात्यांचे निर्बंधांचे शस्त्र निरर्थक ठरल्याची माहिती समोर येत आहे. २०१४ सालानंतर प्रथमच रशियाचा समावेश पुन्हा एकदा जगातील १० आघाडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये झाल्याचे वृत्त रशियन माध्यमांनी दिले आहे.

पाश्चिमात्य देशांनी निर्बंध लादल्यानंतर देखील रशियाचा जगातील दहा आघाडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये समावेशरशियाच्या ‘स्पुटनिक’ या वृत्तसंस्थेने ‘वर्ल्ड बँके’ने प्रसिद्ध केलेल्या माहितीच्या आधारे हा दावा करीत असल्याचे सांगितले आहे. २०२२ सालातील आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली असून रशिया जगातील आठव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे. गेल्या वर्षी रशियाचा ‘जीडीपी’ २.३ ट्रिलियन डॉलर्स इतका नोंदविण्यात आल्याचे ‘वर्ल्ड बँके’ने प्रसिद्ध केलेल्या माहितीत सांगण्यात आले. २०१४ साली रशिया नवव्या क्रमांकाची तर २०२१ साली ११व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होता, अस ‘स्पुटनिक’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हंटले आहे.

अमेरिका व चीन जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था ठरल्या असून त्यापाठोपाठ जपान, जर्मनी व भारताचा क्रमांक आहे. पाश्चिमात्य देशांनी निर्बंध लादल्यानंतर देखील रशियाचा जगातील दहा आघाडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये समावेशब्रिटन व फ्रान्स सहाव्या तसेच सातव्या स्थानावर असून रशिया आठव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरली आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाच्या परकीय गंगाजळीने ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठल्याची माहितीही समोर आली होती.

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस युक्रेनविरोधात संघर्ष छेडल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियाची परदेशातील गंगाजळी गोठविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे रशियाची ४० टक्क्यांहून अधिक गंगाजळी गोठविण्यात आली आहे. त्यानंतर रशियाच्या गंगाजळीला मोठा फटका बसून रशियन अर्थव्यवस्था कोसळेल, असे दावे पाश्चिमात्य अधिकारी व यंत्रणांकडून करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात इंधनक्षेत्रातून रशियाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळाल्याचे समोर आले आहे.

leave a reply