सलग दुसऱ्या दिवशी रशियाचे युक्रेनची राजधानी किव्हवर क्षेपणास्त्र हल्ले

- सुरक्षेच्या कारणामुळे झॅपोरिझिआतील अणुप्रकल्प बंद केला

मॉस्को/किव्ह – रशियन सैन्याने सलग दुसऱ्या दिवशी युक्रेनची राजधानी किव्हवर क्षेपणास्त्र हल्ले चढविले. सोमवारी रात्री तसेच मंगळवारी हे हल्ले करण्यात आल्याची माहिती युक्रेनच्या यंत्रणांनी दिली. राजधानी किव्हव्यतिरिक्त खार्किव्ह तसेच खेर्सन प्रांतही हल्ल्यांचे लक्ष्य ठरल्याचा दावा युक्रेनच्या माध्यमांनी केला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर रशियाने झॅपोरिझिआमधील अणुप्रकल्प बंद केला असून शहरातील नागरिकांचे स्थलांतर सुरू केल्याचे समोर येत आहे.

सलग दुसऱ्या दिवशी रशियाचे युक्रेनची राजधानी किव्हवर क्षेपणास्त्र हल्ले - सुरक्षेच्या कारणामुळे झॅपोरिझिआतील अणुप्रकल्प बंद केलामंगळवारी साजऱ्या होणाऱ्या व्हिक्टरी डेच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री व सोमवारी रशियाने युक्रेनची राजधानी किव्हसह ओडेसा, खेर्सन, मायकोलेव्ह व खार्किव्हवर जोरदार हवाईहल्ले चढविले होते. हल्ल्यांचे हे सत्र सोमवारी रात्री तसेच मंगळवारीही सुरू राहिल्याचे दिसून आले. सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटे युक्रेनची राजधानी किव्हवर सुमारे १५ क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. रशियाने लढाऊ विमानांच्या सहाय्याने ही क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती युक्रेनने दिली आहे.

राजधानी किव्हपाठोपाठ खार्किव्ह प्रांत तसेच दक्षिणेतील खेर्सन प्रांतातही हल्ले करण्यात आले. या प्रांतांमध्ये क्षेपणास्त्रांसह दीर्घ पल्ल्याच्या रॉकेटस्‌‍चाही मारा करण्यात आल्याचे सांगण्यात येते. एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून रशियाने पुन्हा एकदा मोठे क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले सुरू केले आहेत. सोमवारी रात्री व मंगळवारी केलेले हल्ले हा गेल्या १० दिवसांमधील सहावा हल्ला ठरतो.

सलग दुसऱ्या दिवशी रशियाचे युक्रेनची राजधानी किव्हवर क्षेपणास्त्र हल्ले - सुरक्षेच्या कारणामुळे झॅपोरिझिआतील अणुप्रकल्प बंद केलारशियाचे मोठे हल्ले सुरू असतानाच दक्षिण युक्रेनमधील झॅपोरिझिआमधील परिस्थिती चिघळण्याचे संकेत मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने शहरातील अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेवरून मोठ्या दुर्घटनेची शक्यता असल्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर रशियाने सोमवारी अणुऊर्जा प्रकल्प बंद करीत असल्याची घोषणा केली.

युक्रेनकडून रशियावर करण्यात येणारे संभाव्य प्रतिहल्ले झॅपोरिझिआ तसेच खेर्सन प्रांतात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी युक्रेनने मोठ्या प्रमाणात लष्करी तैनाती केल्याचा दावाही करण्यात आला आहे. हे लक्षात घेऊन रशियाने आपली बचावफळी अधिक भक्कम करण्यास सुरुवात केली आहे. अणुऊर्जा प्रकल्प बंद करणे त्याचाच भाग असल्याचे मानले जाते. त्याचवेळी गेल्या काही दिवसांमध्ये झॅपोरिझिआमधील शेकडो नागरिकांचे स्थलांतरही करण्यात आल्याचे समोर आले आहे.

हिंदी

 

leave a reply