स्वित्झर्लंडमध्ये रशियन सोन्याची आयात वाढली

बर्न/मॉस्को – रशियातून आयात होणाऱ्या सोन्यावर निर्बंध लादण्यात आले असतानाही स्वित्झर्लंडमध्ये रशियन सोन्याची आयात होत असल्याचे उघड झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात स्वित्झर्लंडने 6.4 टन सोने रशियातून आयात केल्याचे स्विस कस्टम्स यंत्रणेने दिलेल्या माहितीतून समोर आले. यापूर्वी मे महिन्यातही स्वित्झर्लंडने रशियातून तीन टनांपेक्षा अधिक सोने आयात केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

imports into Switzerlandरशिया हा सोन्याच्या उत्पादनात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश म्हणून ओळखण्यात येतो. जगातील अनेक देश रशियाकडून मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात करीत असून त्यात युरोपिय देश आघाडीवर आहेत. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर लादलेल्या निर्बंधांनंतर युरोपातील अनेक देशांनी रशियन सोन्याची आयात बंद केली होती. स्वित्झर्लंडनेही ऑगस्ट महिन्यात रशियन सोन्याच्या आयातीवर बंदी टाकत असल्याची घोषणा केली होती.

मात्र त्यानंतरही स्वित्झर्लंडमध्ये रशियन सोन्याची आयात मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे नव्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात स्वित्झर्लंडने 37 कोटी डॉलर्सचे रशियन सोने आयात केल्याचे समोर आले आहे. ‘स्विस असोसिएशन ऑफ प्रेशियस मेटल मॅन्युफॅक्चरर्स ॲण्ड डिलर्स’ या संघटनेने सदर आयातीशी स्विस कंपन्यांचा संबंध नसल्याचा दावा केला. मात्र सोने स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले असून प्रक्रियेसाठी आल्याचा दावा करण्यात येतो. स्वित्झर्लंडने हे जगातील आघाडीचे ‘गोल्ड रिफायनरी हब’ म्हणून ओळखण्यात येते.

हिंदी English

leave a reply