युक्रेनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून लष्कराचा विस्तार करण्याचे आदेश

- लष्करातील जवानांची संख्या 15 लाखांपर्यंत नेणार

विस्तार करण्याचे आदेशमॉस्को – रशियाकडून युक्रेनवर नवे आक्रमण होण्याची शक्यता अधिकच बळावली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, रशियन संरक्षणदलांचा विस्तार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रशियन संरक्षणदलातील जवानांची संख्या 15 लाखांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. सध्या रशियन संरक्षणदलातील जवानांची संख्या 10 लाख आहे. 2026 सालापर्यंत हा विस्तार पूर्ण होईल, अशी माहिती रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी दिली. त्याचबरोबर फिनलँडच्या सीमेनजिक दोन नव्या मिलिटरी डिस्ट्रिक्टची उभारणी करण्यात येणार असून स्वतंत्र ‘आर्मी कॉर्प्स’ही स्थापन करण्याची घोषणा शोईगू यांनी केली.

विस्तार करण्याचे आदेशरशियाकडून युक्रेनविरोधात ‘स्प्रिंग ऑफेन्सिव्ह’ राबविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे दावे गेल्या काही दिवसांमध्ये समोर आले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गेल्या काही दिवसांमध्ये घेतलेले निर्णय रशियाला ‘वॉर इकॉनॉमी’कडे घेऊन जाणारे असल्याचेही युक्रेन व पाश्चिमात्य माध्यमे सांगत आहेत. यामागे युक्रेनमधील युद्ध दीर्घकाळपर्यंत चालू ठेवण्याची योजना असू शकते, असे युक्रेनचे संरक्षणमंत्री ओलेक्सी रेझ्नीकोव्ह यांनी बजावले होते.

विस्तार करण्याचे आदेशगेल्या महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, नव्या लष्करी भरतीसह शस्त्रानिर्मितीचा वेग वाढविण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच युक्रेनमधील लष्करी मोहिमेची जबाबदारी देशाच्या संरक्षणदलप्रमुखांकडे सोपविण्याची घोषणाही करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता संरक्षणदलातील जवानांची संख्या वाढविण्याबाबत घेतलेला निर्णय लक्ष वेधून घेणारा ठरतो.

गेल्या काही दिवसात रशियन राजवटीकडून युक्र्रेनमधील संघर्ष हा युक्रेन सरकार अथवा फौजांविरोधात नाही तर नाटोविरोधात सुरू असलेली लढाई असल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. त्याचवेळी नजिकच्या काळात रशिया आपल्या हल्ल्यांची व्याप्ती अधिक वाढवेल व त्यात ‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स’चा समावेश असू शकतो, असे इशारेही देण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर, अमेरिका तसेच नेदरलॅण्डस्‌‍ या देशांनी युक्रेनला पॅट्रिऑट क्षेपणास्त्र यंत्रणा पुरविण्याची घोषणा केली आहे. रशियाकडून सुरू असलेल्या नव्या तयारीच्या पार्श्वभूमीवरच युक्रेन व पाश्चिमात्य आघाडीनेही हालचाली सुरू केल्या असून नुकतीच अमेरिकेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने युक्रेनला भेटही दिली होती.

English हिंदी

leave a reply