‘मेड इन चायना’ लेबलने चिनी मालाची विक्री करा

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टला वाणिज्य मंत्रालयाचे आदेश

नवी दिल्ली – भारतात ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांना या पुढे ‘मेड इन चायना’ लेबल लावूनच चिनी मालाची विक्री करावी लागेल. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला असून त्याची त्वरित अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे अनावधानाने चिनी उत्पादने खरेदी करण्याचा धोका टळेल.

India-Chinaवाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाची बुधवारी ई-कॉमर्स क्षेत्रातील १४ कंपन्यांनाबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून बैठकीत पार पडली. या बैठकीत अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसह सर्व कंपन्यांना चिनी उत्पादनांवर ‘मेड इन चायना’ लेबल लावणे बंधनकारक असल्याचे बजावण्यात आले. यामुळे भारतीय ग्राहकांची फसगत टळेल. गलावान व्हॅलीमध्ये हल्ला करून विश्वासघात करणाऱ्या चीनने भारताच्या २० सैनिकांना शहिद केले होते. त्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे या घटनेनंतर भारतीय लष्कर सीमेवर चीनला सडेतोड उत्तर देत आहे. मात्र भारतीय बाजारपेठेतून दरवर्षी अब्जावधी डॉलर्स कमावणाऱ्या चीनला अद्दल घडवण्यासाठी भारतीय ग्राहकांनी पुढाकार घ्यावा यासाठी देशभरात जन आंदोलन छेडण्यात आले आहे. याला केवळ ग्राहकांकडूनच नाहीतर व्यापाऱ्यांकडूनही फार मोठा प्रतिसाद मिळत आहे. व्यापारी संघटनांनी चिनी उत्पादकांवर बहिष्काराची घोषणा केली आहे.

मात्र अजूनही भारतीय बाजारपेठेत चिनी उत्पादने असून ऑनलाईन विक्री करण्यात येणाऱ्या स्नॅपडील, पेपरफ्राय, हिरोईन या ई-कॉमर्स कंपन्यामार्फत चिनी उत्पादनाची मोठा प्रमाणात विक्री केली जाते. ही उत्पादने खरेदी करणाऱ्या बऱ्याच ग्राहकांना सदर उत्पादने चिनी बनावटीची आहेत याची कल्पना नसते यामुळे अनावधानाने चिनी मालाची खरेदी करण्याचे प्रमाण मोठे आहे. गलावान व्हॅलीमधील संघर्षानंतर मात्र भारतीय ग्राहक आपण खरेदी करत असलेली उत्पादने चिनी बनावटीची नाहीत ना याची खात्री करून घेत आहेत. अशा परिस्थितीत ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्याना मेड इन चायना लेबल लावून चिनी उत्पादनांची विक्री करण्याचा वाणिज्य मंत्रालयाने दिलेला आदेश जनभावना व्यक्त करत आहे.

leave a reply