चीनमधील ‘उघूरां’साठीच्या शिबिरांप्रमाणे पाकिस्तानात ‘बलोचीं’ ची शिबीरे

मुझफ्फराबाद  – चीनने झिनजियांग प्रातांत उघुर वंशीयांना डांबून ठेवण्यासाठी उघडलेलेल्या शिबिरांप्रमाणे पाकिस्तानने बलोचिस्तानात शिबीरे उघडल्याची माहिती समोर येत आहे. बलोचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी तीव्र झाली असून बलोच बंडखोरी संघटनांनी या प्रातांत हल्ले वाढविले आहेत. येथील परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि बालोची संस्कृती मिटविण्यासाठी पाकिस्तानने आपला मित्र असलेल्या चीनपासूनच प्रेरणा घेत ‘डिटेन्शन कॅम्प’ सुरु केले आहेत. पाकिस्तानच्या लष्कराने गुप्तरित्या ही शिबीरे उघडली आहेत. येथे बलोच बंडखोरांचे ब्रेन वॉश केले जात आहे, अशा बातम्या आहेत.

चीन सरकार झिंजियांग प्रांतात उघुर वंशियांसाठी ‘री-एज्युकेशन कॅम्प चालवित आहेत. या शिबीरात चीनच्या लष्कराकडून उघुर वाशियांवर अन्वयित अत्याचार केले जातात. उघुरांचे या शिबीरांमध्ये ब्रेन वॉश केले जाते व त्यांना आपली संस्कृती सोडून गुलाम बनण्यास भाग पाडले जात आहे. उघुरांवरील या अत्याचाराविरोधात साऱ्या जगभरातून चीनवर सातत्याने टीका करण्यात येते.

आता पाकिस्तानने चीनप्रमाणेच बलोचींसाठी अशी शिबीरे सुरु केली आहेत. चीनने उघूरांसाठी सुरु केलेल्या शिबिरांप्रमाणे हुबेहूब ही शिबीरे असून पाकिस्तानी लष्कराकडून हाताळली जात आहेत. तसेच या छावण्यांमध्ये बलोच बंडखोरांचा ब्रेनवॉश करण्यासाठी दहशतवाद्यांचे सहाय्य घेतले जात असल्याचा वृत्त अहवाल आहे. पाकिस्तानने लष्कराने दोन शिबिरे आतापर्यंत सुरु केली असून पाकिस्तानी लष्कराचे माजी प्रवक्ते जनरल असीम बाजवा यांनी बलोची बंडखोरांसाठीच्या या ‘डिटेन्शन कॅम्प’ यॊजन आखली होती, असा दावा केला जातॊ.

leave a reply