बेकायदेशीर स्थलांतरितांवर कठोर कारवाई होणार

- ब्रिटनचे पंतप्रधान रिषी सुनाक

लंडन – इंग्लिश खाडी ओलांडून बेकायदेशीररित्या ब्रिटनमध्ये प्रवेश करणाऱ्या स्थलांतरितांना यापुढे सहन केले जाणार नाही. अशा स्थलांतरितांवर कठोर कारवाई होणारच, अशी घोषणा ब्रिटनचे पंतप्रधान रिषी सुनाक यांनी केली. यासाठी इंग्लिश खाडीत स्थलांतरितांसह प्रवेश करणाऱ्या छोट्या जहाजांवर कारवाई करण्याचे संकेत सुनाक यांनी दिले.

गेल्या दोन वर्षांमध्ये इंग्लिश खाडी पार करून ब्रिटनमध्ये दाखल झालेल्या स्थलांतरितांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. यामध्ये अल्बानियातून आलेल्या स्थलांतरितांची संख्या मोठी आहे. याकडे लक्ष वेधून ब्रिटनमध्ये बेकायदेशीररित्या घुसखोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान म्हणाले. या स्थलांतरितांमुळे ब्रिटनमध्ये बेरोजगारी वाढत असल्याचा दावा केला जातो. यासाठी ब्रिटनचे सरकार नवे पथक उभारत आहे. येत्या काळात स्थलांतरितांना हॉटेलमध्ये ठेवण्याऐवजी त्यांना मोकळ्या मैदानात, विद्यार्थी वसाहती किंवा लष्कराच्या अतिरिक्त भूभागावर वसविण्यात येईल, अशी माहिती ब्रिटनच्या पंतप्रधानांनी दिली.

leave a reply