तैवान क्षेपणास्त्रांची निर्मिती दुपटीने वाढविणार

तैपेई – नव्या प्रकल्पाची उभारणी झाल्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या तैवानने क्षेपणास्त्रांची निर्मिती दुपटीने वाढविणार असल्याची घोषणा केली. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने संसदेसमोर सादर केलेल्या आपल्या अहवालात ही माहिती दिली. चीनबरोबर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तैवानची ही घोषणा लक्षवेधी ठरते.

तैवान क्षेपणास्त्रांची निर्मिती दुपटीने वाढविणारतैवानच्या ‘नॅशनल शूंग-शान इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी-एनसीएसआयएसटी’मध्ये सध्या दरवर्षी सहा प्रकारच्या सुमारे 200 क्षेपणास्त्रांची निर्मिती केली जाते. पण ‘एनसीएसआयएसटी’ नवा प्रकल्प उभारत असल्यामुळे क्षेपणास्त्रांची निर्मिती दुपटीने वाढून वर्षाकाठी किमान 500 क्षेपणास्त्रे इथे तयार केली जातील, असा दावा तैवानी यंत्रणा करीत आहेत. यामध्ये हवेतून हवेत मारा करणाऱ्या ‘स्काय स्वर्ड टू’ आणि ‘स्काय बो थ्री’ या क्षेपणास्त्रांची निर्मिती दुपटीने किंवा तिपटीने वाढू शकेल, अशी माहिती समोर येत आहे.

तर सध्या दरवर्षी ‘हेयूंग फेंग थ्री’ मध्यम पल्ल्याच्या सुपरसोनिक क्षेपणास्त्राची तैवानकडून निर्मिती केली जाते. तैवान क्षेपणास्त्रांची निर्मिती दुपटीने वाढविणारमात्र नव्या प्रकल्पाच्या उभारणीमुळे या क्षेपणास्त्रांची संख्या 70 वर पोहोचेल, असा दावा केला जातो. चीनने तैवानच्या दिशेने क्षेपणास्त्रे रोखलेली असल्याचे दावे केले जातात. कुठल्याही क्षणी तैवानचा ताबा घेण्याची क्षमता चिनी संरक्षणदलांकडे असल्याचे चिनी नेते व सरकारी माध्यमे सातत्याने सांगत आहेत. मात्र तैवानने आपल्या संरक्षणसिद्धतेत प्रचंड प्रमाणात वाढ केली असून तैवानचा ताबा घेणे चीनला वाटत आहे, तितकी सोपी बाब ठरणार नाही, असे काही सामरिक विश्लेषक ठासून सांगत आहेत. त्यासाठी हे विश्लेषक तैवानच्या संरक्षणसिद्धतेचा दाखला देत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, तैवानने आपल्या क्षेपणास्त्र निर्मितीची क्षमता वाढविण्यासाठी पावले उचलून आपण चीनला टक्कर देण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश दिला आहे.

leave a reply