तालिबान पाकिस्तानी लष्कराच्या इशार्‍यावर काम करीत आहे

- अफगाणी वर्तमानपत्राचा आरोप

पाकिस्तानी लष्कराच्या इशार्‍यावरकाबुल – पाकिस्तानचे लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेकडून मिळणार्‍या आदेशांची तालिबानचे दहशतवादी अंमलबजावणी करतात. तालिबानचे नेते बिनधास्तपणे पाकिस्तानमध्ये संचार करतात आणि आपल्या कारवायांसाठी उघडपणे निधी गोळा करतात, असा आरोप अफगाणिस्तानच्या वर्तमानपत्राने केला.

अफगाणिस्तान अशांत ठेवणे, संघर्ष भडकवित राहून अफगाणिस्तानाला स्थीर सरकार मिळू न देणे, हा पाकिस्तानच्या धोरणांचा भाग असल्याचा ठपका काबुल टाईम्स या अफगाणी वर्तमानपत्राने केला. अफगाणिस्तान स्थैर्य हवे असेल तर पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले चढविले भाग आहे, असा दावा या वर्तमानपत्राने केला आहे.

या वर्तमानपत्राने अफगाणी जनतेच्या भावना व्यक्त केल्याचे दिसत आहे. पाकिस्तानच्या पाठिंब्याखेरीज तालिबान एक दिवस देखील तग धरू शकणार नाहीत, असे अफगाणी नेत्यांचे म्हणणे आहे. पाकिस्तान कितीही नाकारत असले तरी तालिबानला पाकिस्तानकडून सर्वतोपरी सहाय्य केले जात आहे. पैसे, शस्त्रास्त्रे आणि जखमी दहशतवाद्यांवर उपचारांसाठी तालिबान पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबून आहे. पाकिस्तानच्या मंत्र्यांनीही ही बाब मान्य केली होती. त्यामुळे काबुल टाईम्सने पाकिस्तानवर केलेली टीका अफगाणी जनतेचा पाकिस्तानविरोधातील असंतोष व्यक्त करणारी ठरते आहे.

leave a reply