तालिबानने पाकिस्तानजवळील सुरक्षाचौकीचा ताबा घेतला

काबुल – अफगाणिस्तानच्या कंदाहर प्रांतातील स्पिन बोल्दाकची सीमाचौकी ताब्यात घेतल्याची घोषणा तालिबानने केली. या भागाला भ्रष्ट अफगाणी नेते आणि अधिकार्‍यांपासून मुक्त केल्याचा दावा तालिबानने केला. गेल्या दहा दिवसात तालिबानने पाकिस्तानच्या सीमेजवळील ताब्यात घेतलेली ही दुसरी सुरक्षाचौकी ठरते. या घटनेनंतर पाकिस्तानने त्वरीत आपली सीमा बंद करून वाहतूक रोखली.

तालिबानने पाकिस्तानजवळील सुरक्षाचौकीचा ताबा घेतला पाकिस्तानच्या बलोचिस्तान प्रांतातील चमन तर अफगाणिस्तानातील स्पिन बोल्दाक चौकीचा तालिबानने ताबा घेतला. तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिदने याची माहिती जाहीर केली. चमनमार्गे पाकिस्तानला जोडणारी ही सीमा अत्यंत महत्त्वाची असल्याचे तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले. तालिबानच्या दहशतवाद्यांबरोबर झालेल्या संघर्षानंतर अफगाणी जवानांनी सदर चौकी सोडून पळ काढल्याचा दावा केला जातो.तालिबानने पाकिस्तानजवळील सुरक्षाचौकीचा ताबा घेतला

स्पिन बोल्दाकमधील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानच्या दहशतवाद्यांनी येथील बाजारभागापासून, पोलीस मुख्यालय, सीमेवरील जकातचौकीचा ताबा घेतला.

leave a reply