तंत्रज्ञान व क्रिप्टो क्षेत्राला अर्थसहाय्य पुरविणारी अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोरीत

- राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून बँकिंग क्षेत्र सुरक्षित असल्याचा दावा

वॉशिंग्टन – ‘सिल्व्हरगेट’ व ‘एसव्हीबी’पाठोपाठ अमेरिकेतील ‘सिग्नेचर बँक’ दिवाळखोरीत गेल्याचे उघड झाले. एका आठवड्यात अमेरिकेतील तिसरी बँक अपयशी ठरल्याने देशातील बॅकिंग क्षेत्र संकटात असल्याचे संकेत मिळाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सोमवारी अमेरिकेतील बँकिंग क्षेत्र सुरक्षित असल्याचा दावा केला. मात्र अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर टीकास्त्र सोडले असून देश १९३०च्या दशकातील आर्थिक महामंदीच्या दिशेने प्रवास करीत असल्याचा ठपका ठेवला.

तंत्रज्ञान व क्रिप्टो क्षेत्राला अर्थसहाय्य पुरविणारी अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोरीत - राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून बँकिंग क्षेत्र सुरक्षित असल्याचा दावागेल्या आठवड्यात ८ मार्च रोजी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतातील ‘सिल्व्हरगेट बँके’ने दिवाळखोरीची घोषणा केली होती. त्यानंतर शुक्रवारी ‘सिलिकॉन व्हॅली बँक’ दिवाळखोरीत गेल्याचे अमेरिकी यंत्रणांनी जाहीर केले. त्यापाठोपाठ रविवारी न्यूयॉर्क स्थित ‘सिग्नेचर बँक’ बंद करीत असल्याचे अमेरिकी यंत्रणांकडून सांगण्यात आले. अवघ्या पाच दिवसांच्या अवधीत अमेरिकेतील तीन बँकांनी गाशा गुंडाळल्याने देशातील बँकिंग क्षेत्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हे उमटत असून आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याचे पडसाद उमटले आहेत. अपयशी ठरलेल्या तीन बँकांपैकी ‘सिलिकॉन व्हॅली बँक’ ही अमेरिकेतील २० आघाडीच्या बँकांपैकी एक म्हणून ओळखण्यात येते. या बँकेची परदेशातही कार्यालये आहेत. ब्रिटनसारख्या देशात याची मोठी व्याप्ती असून या देशातील ‘सिलिकॉन व्हॅली बँक’ ब्रिटनमधील आघाडीची बँक असणाऱ्या ‘एचएसबीसी’ने ताब्यात घेतली आहे. ‘सिलिकॉन व्हॅली बँक’ला बेलआऊट दिला जाणार नसल्याचे अमेरिकेच्या अर्थमंत्री जॅनेट येलेन यांनी रविवारी जाहीर केले होते. मात्र त्याला काही तास उलटत नाहीत तोच राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी या बँकेतील निधी सुरक्षित असल्याचे जाहीर केले.

तंत्रज्ञान व क्रिप्टो क्षेत्राला अर्थसहाय्य पुरविणारी अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोरीत - राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून बँकिंग क्षेत्र सुरक्षित असल्याचा दावासोमवारी सकाळी अमेरिकी जनतेला उद्देशून केलेल्या वक्तव्यात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अमेरिकेतील बँकिंग क्षेत्र सुरक्षित असल्याची ग्वाही दिली. त्याचवेळी ‘सिलिकॉन व्हॅली बँके’तील निधी खातेदारांना उपलब्ध करून देण्यात येईल, असेही जाहीर केले. अमेरिकी नियमांनुसार, एखादी बँक दिवाळखोरीत गेल्यास त्यातील अडीच लाख डॉलर्सपर्यंतचा निधी खातेदाराला मिळू शकतो. यासंदर्भातील प्रक्रिया ‘फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन’(एफडीआयसी) पार पाडते. मात्र एकापाठोपाठ तीन बँका अपयशी ठरल्याने उमटणारे पडसाद लक्षात घेता बायडेन प्रशासनाने ‘सिलिकॉन व्हॅली बँक’ व ‘सिग्नेचर बँक’ या दोन्हींच्या खातेदारांना निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

या दोन्ही बँका अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘स्टार्टअप्स’ व क्रिप्टोकरन्सी क्षेत्राशी जोडलेल्या आहेत. दोन्ही बँकांमध्ये या क्षेत्रातील कंपन्यांची खाती व निधी मोठ्या प्रमाणात आहे. ‘एफटीएक्स’ घोटाळ्यामुळे अमेरिकेतील क्रिप्टोकरन्सी क्षेत्राला जबर मोठा फटका बसला आहे. त्यात या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बँका अपयशी ठरल्यास त्याचे व्यापक व गंभीर पडसाद उमटू शकतात. तंत्रज्ञान व क्रिप्टो क्षेत्राला अर्थसहाय्य पुरविणारी अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोरीत - राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून बँकिंग क्षेत्र सुरक्षित असल्याचा दावात्यामुळेच बायडेन प्रशासन सक्रिय झाल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बँकिंग क्षेत्रातील संकटावरून बायडेन प्रशासनावर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची तुलना गेल्या शतकातील अमेरिकी राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूवर यांच्याशी केली. बायडेन हे आधुनिक युगातील हूवर ठरतील, असा दावा ट्रम्प यांनी केला. ‘अमेरिकेला १९२९ पेक्षा अधिक व्यापक आर्थिक मंदीचा मुकाबला करावा लागेल. अमेरिकेत कोसळणाऱ्या बँका हा त्याचा पुरावा आहे’, अशा शब्दात ट्रम्प यांनी नव्या आर्थिक संकटाकडे लक्षवेधले.

हिंदी

 

leave a reply