तुर्कीच्या हवाई दलाचे सिरिया, इराकमध्ये हल्ले

इराकमध्ये हल्लेइस्तंबूल – इस्तंबूल शहरात झालेल्या बॉम्बस्फोटासाठी कुर्द जबाबदार असल्याचा आरोप करून तुर्कीने सिरिया व इराकमधील कुर्दवंशियांची बहुसंख्य ठिकाणांवर हवाई हल्ले चढविले. या हल्ल्यात कुर्दांना मोठी जीवितहानी सहन करावी लागल्याचा दावा तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने केला. ‘आता हिशेब चुकते करण्याची वेळ आली आहे’, असा इशारा तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने दिला.

१३ नोव्हेंबर रोजी तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये झालेल्या कारबॉम्बस्फोटात सहा जणांचा बळी गेला तर ८० जण जखमी झाले होते. तुर्कीच्या यंत्रणेने या हल्ल्यासाठी स्थानिक ‘पीकेके’ तसेच सिरियातील ‘वायपीजी’ या कुर्द गटांना जबाबदार धरले होते. तसेच इस्तंबूल हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्या या संघटनांवर कारवाई करण्यासाठी लवकरच इराक व सिरियात हल्ले चढविणार असल्याचा इशारा दिला होता. पीकेके, वायपीजी तसेच इतर कुर्द गटांनी इस्तंबूल हल्ल्याप्रकरणी तुर्कीने केलेले आरोप फेटाळले होते. तसेच तुर्की कुर्दांना लक्ष्य करण्यासाठी चुकीचे आरोप करीत असल्याची टीका केली होती. पण शनिवारी रात्री इराक व सिरियात हवाई हल्ले चढवून तुर्कीने कुर्दांवरील हल्ले थांबणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

leave a reply