‘लश्कर’च्या दोन दहशतवाद्यांना हैदराबादमधून अटक

- चालत्या रेल्वेत स्फोट घडविण्याचा कट होता

नवी दिल्ली – राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) हैदराबादमधून दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. बारा दिवसांपूर्वी बिहारच्या दरभंगा येथील रेल्वे स्टेशनवर एका कापडाच्या गोठडीमध्ये स्फोट झाला होता. हा दहशतवादी हल्ला असल्याचे व यामध्ये आयईडी वापरण्यात आल्याचे तपासात उघड झाले होते. याच प्रकरणात फरार असलेल्या दोन दहशतवाद्यांना हैदराबादमध्ये अटक झाली आहे. हे दोन्ही ‘लश्कर-ए-तोयाबा’शी जोडलेले आहेत. तसेच यामधील एकाने पाकिस्तानात जाऊन दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतल्याचेही उघड झाले आहे. याबरोबरच त्याने पाकिस्तानामध्ये ‘लश्कर-ए-तोयबा’चा प्रमुख हफीज सईदचीही भेट घेतल्याचे चौकशीत सांगितले.

‘लश्कर’च्या दोन दहशतवाद्यांना हैदराबादमधून अटक - चालत्या रेल्वेत स्फोट घडविण्याचा कट होतानासिर खान उर्फ नासिर मलिक आणि त्याचा भाऊ इम्रान मलिक उर्फ इम्रान खान असे या अटक झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. 17 जून रोजी दरभंगा रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्म क्र. 1 वर रेडीमेड कपड्याच्या एका गोठडीत स्फोट झाला होता. हे कपड्याच्या गोठडीचे पर्सल सिकंदराबादवरून रेल्वे पार्सल सेवेद्वारे दरभंगासाठी पाठविण्यात आले होते. रेल्वेमधून आलेल्या इतर सामानाबरोबर ते फलाट क्रमांक 1 वर एकाबाजूला ठेवण्यात आले होते. त्यावेळी हा स्फोट झाला. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या स्फोटाबाबत संशय आल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला. फॉरेंसिक चाचणीत हा स्फोट आयईडीचा असल्याचे व हा आयईडी या कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. यानंतर एनआयएकडे हा तपास सोपविण्यात आला. 15 जून रोजी हे पार्सल सिकंदराबादमध्ये बुकींग झाल्याने तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दहशतवादी बंदीस्त झाले होते. या दोन्ही दहशतवाद्यांनी पार्सल बुक करण्यासाठी बनावट पॅनकार्डचा वापर केला होता व मोहम्मद सुफीयान नावाने हे पार्सल बुक करण्यात आले होते.

‘लश्कर’च्या दोन दहशतवाद्यांना हैदराबादमधून अटक - चालत्या रेल्वेत स्फोट घडविण्याचा कट होतात्यानंतर या दोघांचा शोध सुरू झाला. अखेर बुधवारी या दोघांना हैदराबादच्या माल्लेपाल्ले भागातून एका भाड्याच्या घरातून अटक करण्यात आले. नासीरचा रेडीमेड कपड्याचा हैदराबादमध्ये व्यवसाय असून गेल्यावर्षीपासून त्याचा भाऊही या व्यवसायात दाखल झाला. दोघांच्या चौकशीत कितीतरी धक्कादायक खुलासे झाले. हे दोघे ‘लश्कर-ए-तोयबा’च्या हस्तकाशी सोशल मीडियाद्वारे संपर्कात होते. तसेच नायट्रीक अ‍ॅसिड, सल्फरीक अ‍ॅसिड आणि साखरेचा वार करून बॉम्ब कसा बनवायचा याचे त्यांनी ऑनलाईन प्रशिक्षणही घेतले होते.

या दोघांनी बॉम्ब बनवून कपड्याच्या गाठोड्यात ठेवला. सुमारे 16 तासाने बॉम्ब फुटेल असा टायमर बसवला. चालत्या रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून मोठा घातपात घडविण्याचा या दोघांचा कट होता. हा स्फोट जर चालत्या रेल्वेत झाला असता, तर रेल्वे रुळावरून घसरुन किंवा आग लागून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र सुदैवाने हा स्फोट दरभंगामध्ये रेल्वे पार्सल उतरल्यावर झाला.

चौकशीत नासिरने 2012 साली पाकिस्तानात जाऊन ‘लश्कर’च्या शिबिरात दहशतवादी कारवाया व आयईडी बसविण्याचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती दिली. यावेळी तो हफीज सईदला भेटल्याचेही त्यांने चौकशीत सांगितले आहे. सध्या एनआयएकडून या दोघांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

leave a reply