अमेरिकेने न्यूक्लिअर ग्रॅविटी बॉम्बची निर्मिती सुरू केली

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या हवाईदलासाठी अतिप्रगत बंकर बस्टर अर्थात ‘बी६१-१२ न्यूक्लिअर ग्रॅविटी बॉम्बची निर्मिती सुरू झाली आहे. दहा दिवसांपूर्वी या बॉम्बचा प्रोटोटाईप तयार केल्याचे अमेरिकेने जाहीर केले. या न्यूक्लिअर ग्रॅविटी बॉम्बमुळे देशाची सुरक्षा अधिकच भक्कम होईल, असे अमेरिकन यंत्रणा सांगत आहेत.

गेल्या पाच दशकांहून अधिक काळ अमेरिकेचे हवाईदल ‘बी६१ बंकर बस्टर बॉम्ब’नी सज्ज आहे. बंकर बस्टर किंवा अर्थ शॅटरींग अर्थात जमीन हादरवून टाकणारा असाही या बॉम्बचा उल्लेख केला जातो. शीतयुद्धाच्या काळात तयार केलेले ‘बी६१’ बॉम्बचा वापर शत्रूचे बंकर्स, तळघर तसेच भुयारीमार्ग उद्ध्वस्त करण्यासाठी केला जातो. पण १९६८ सालापासून हवाईदलाच्या सेवेत असलेल्या बी६१ला पर्याय शोधण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू होते.

गेल्या महिन्यात या बॉम्बची अतिप्रगत आवृत्ती तयार झाल्याची घोषणा अमेरिकेच्या ‘नॅशनल न्यूक्लिअर सिक्युरिटी ऍडमिनिस्ट्रेशन-एनएनएसए’ने केली होती. पुढच्या वर्षी मे महिन्यापासून ‘बी६१-१२’ची मोठ्या प्रमाणात निर्मिती सुरू केली जाईल. अमेरिकन हवाईदलातील एफ-१५ विमानांबरोबरच यापुढे एफ-३५ए स्टेल्थ विमानांनाही या न्यूक्लिअर ग्रॅविटी बॉम्बने सज्ज करण्यात येईल.

leave a reply