अमेरिकेकडून जगातील पहिले ‘सॅटेलाईट लाँचिंग ड्रोन’ तयार

ड्रोनवॉशिंग्टन – अमेरिकेतील ‘एव्हम’ या कंपनीने अंतराळात उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता असणारे प्रगत ड्रोन विकसित केले आहे. 80 फूट लांबीच्या या ड्रोनमध्ये 500 किलोपर्यंत वजन असणारे उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता असल्याची माहिती देण्यात आली आहे. ‘रॅव्हन एक्स’ नावाचे हे ड्रोन दर तीन तासांनी उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करू शकते. अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’साठी हे ड्रोन विकसित करण्यात आले असून 2021मध्ये पहिला उपग्रह अंतराळात पाठविण्यात येणार आहे.

 

leave a reply