तंत्रज्ञान क्षेत्रातील चीनच्या वाढत्या प्रभावाला आव्हान देण्यासाठी अमेरिकन संसदेत चीनविरोधी विधेयक मंजूर

वॉशिंग्टन/बीजिंग – चीनच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या प्रभावाला आव्हान देण्यासाठी अमेरिकेच्या संसदेने नवे विधेयक मंजूर केले आहे. ‘युएस कॉम्पिटिशन अ‍ॅण्ड इनोव्हेशन अ‍ॅक्ट’ असे नाव असलेल्या या विधेयकात अमेरिकेला तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यासाठी 246 अब्ज डॉलर्सची तरतूद करण्यात आली आहे. या विधेयकावर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून अमेरिका एखाद्या भ्रमिष्टाप्रमाणे वागत आहे, अशी टीका चीनच्या संसदेकडून करण्यात आली आहे.

तंत्रज्ञान क्षेत्रातील चीनच्या वाढत्या प्रभावाला आव्हान देण्यासाठी अमेरिकन संसदेत चीनविरोधी विधेयक मंजूरगेल्या दशकभरात चीनने तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी आघाडी घेतल्याचे समोर येत आहे. ‘5जी’पासून ते ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ क्षेत्रापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये चिनी कंपन्या व संशोधन मुसंडी मारत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. आर्थिक बळ व प्रभावाच्या जोरावर चीन आपले तंत्रज्ञान छोट्या व कमकुवत देशांना स्वीकारण्यस भाग पाडत असल्याचीही अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्याचवेळी खनिजे व इतर कच्च्या मालाच्या उत्पादनात मिळविलेल्या वर्चस्वाच्या जोरावर चीन इतर देशांमधील तांत्रिक प्रगतीला वेठीस धरण्याच्या हालचाली करीत असल्याचेही संकेत मिळत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर चीनची तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढती मक्तेदारी मोडून काढण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी आक्रमक मोहीम राबविली होती. अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनविरोधात असलेल्या असंतोषाच्या पार्श्‍वभूमीवर बायडेन प्रशासनानेही ही मोहीम कायम ठेवल्याचे नव्या विधेयाकाच्या मंजुरीवरून दिसत आहे.तंत्रज्ञान क्षेत्रातील चीनच्या वाढत्या प्रभावाला आव्हान देण्यासाठी अमेरिकन संसदेत चीनविरोधी विधेयक मंजूर

अमेरिकी संसदेच्या सिनेटमध्ये ‘युएस कॉम्पिटिशन अ‍ॅण्ड इनोव्हेशन अ‍ॅक्ट’ 68 विरुद्ध 32 मतांनी मंजूर करण्यात आला. या मंजुरीनंतर तो पुन्हा प्रतिनिधीगृहाकडे पाठविण्यात येणार असून तिथे त्याला सहज मंजुरी मिळेल, असे सांगण्यात येते. नव्या विधेयकात, अमेरिकेतील विविध उपक्रमांना प्रगत तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचवेळी सेमीकंडक्टर क्षेत्रातील ‘सप्लाय चेन’ सुरळीत ठेवण्यासाठी अमेरिकी उद्योगांनाही सहाय्य पुरविण्यात येणार आहे.

चीनच्या प्रभावाला आव्हान देणार्‍या या विधेयकाविरोधात चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. अमेरिका एखाद्या भ्रमिष्टाप्रमाणे वर्तन करीत असल्याचा आरोप चीनच्या संसदेने केला. त्याचवेळी सिनेटमध्ये मंजूर झालेले विधेयक शीतयुद्धकालिन मानसिकता व पूर्वग्रहदूषित वैचारिक दृष्टिकोन दाखविणारे असल्याची टीकाही चीनच्या संसदेने केली. चीनच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीला खीळ घालण्याच्या हालचाली अमेरिकेकडून सुरू असल्याचा ठपकाही चीनने ठेवला आहे.

leave a reply