अमेरिका व तैवानमध्ये व्यापारी चर्चेची घोषणा

व्यापारी चर्चेची घोषणावॉशिंग्टन/तैपेई – सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीवरून वातावरण तापले असतानाच अमेरिका व तैवानने द्विपक्षीय व्यापारी चर्चेची घोषणा केली आहे. अमेरिका तसेच तैवानच्या व्यापारी प्रतिनिधींनी याची घोषणा केली. अमेरिकेने तैवानबरोबर ११ व्यापारी क्षेत्रांमध्ये वाटाघाटींची तयारी केली असून तैवानला २१ व्या शतकातील अधिक समृद्ध व लवचिक अर्थव्यवस्था बनविण्यासाठी सहाय्य करु, असे अमेरिकेच्या व्यापारी उपप्रतिनिधी साराह बिआंची यांनी सांगितले. अमेरिका-तैवान चर्चेवर चीनने नाराजी व्यक्त केली आहे.

जून महिन्यात अमेरिका व तैवानच्या अधिकाऱ्यांनी ‘युएस-तैवान इनिशिएटिव्ह ऑन २१स्ट-सेंच्युरी ेड’ या उपक्रमाला मान्यता दिली होती. या माध्यमातून अमेरिका व तैवानमध्ये आर्थिक तसेच व्यापारी करारांचा पाया विकसित करण्यात येईल, असे संकेत देण्यात आले होते. गुरुवारी द्विपक्षीय व्यापारी चर्चेबाबत झालेली घोषणा त्याचाच पुढील टप्पा ठरतो. येत्या दोन ते तीन महिन्यात अधिकृत चर्चेला सुरुवात होईल, अशी माहिती दोन्ही देशांनी दिली.

अमेरिकेने गेल्या काही वर्षात राजनैतिक, व्यापारी, आर्थिक तसेच संरक्षण स्तरावर तैवानला मोठ्या प्रमाणात सहकार्य पुरविण्यास सुरुवात केली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड म्प यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. ‘अमेरिकन इन्स्टिट्यूट इन तैवान’ रुपात अमेरिकेने तैवानमध्ये ‘डिफॅक्टो एम्बसी’ सुरू केली होती. त्यानंतर सेमीकंडक्टरसह अनेक क्षेत्रांमध्ये तैवानबरोबरील संबंध बळकट करण्यासाठी पावले उचलली होती. ‘ेड ॲण्ड इन्व्हेस्टमेंट फ्रेमवर्क ॲग्रीमेंट’ व ‘टेक्नॉलॉजी, ेड ॲण्ड इन्व्हेस्टमेंट कोलॅबरेशन’ हे उपक्रम त्याचा भाग ठरतात. ‘युएस-तैवान इनिशिएटिव्ह ऑन २१स्ट-सेंच्युरी ेड’ हा तैवानबरोबर व्यापारी करार करण्याच्या तयारीचा भाग असल्याचा दावा विश्लेषकांनी केला आहे.

अमेरिका व तैवानमधील नव्या सहकार्यावर चीनकडून प्रतिक्रिया उमटली आहे. ‘अमेरिका-तैवान चर्चेला चीनचा तीव्र विरोध असून आपले हितसंबंध राखण्यासाठी चीन आवश्यक पावले उचलेल’, असे चीनच्या वाणिज्य विभागाच्या प्रवक्त्यांनी बजावले.

leave a reply