अमेरिका सिरियाच्या राक्कामध्ये पहिला लष्करी तळ उभारणार

सिरियन मानवाधिकार संघटनेचा दावा

us syria raqqa baseतेहरान – अमेरिका सिरियात नव्याने सैन्य तैनाती सुरू करीत आहे. सिरियाच्या अल-राक्का प्रांतात अमेरिका पहिले लष्करी तळ उभारीत असल्याचा दावा ब्रिटनस्थित सिरियन मानवाधिकार संघटनेने केला. तीन वर्षांपूर्वी अमेरिकेने सिरियातून सैन्यमाघार घेतली होती. त्यामुळे अमेरिकेची ही तैनाती सिरियातील नव्या लष्करी मोहिमेचे संकेत देणारी ठरत आहे.

अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘आयएस’ला सिरियातून संपविल्याचा दावा करून येथील अमेरिकन लष्कराला मायदेशी बोलाविले होते. ट्रम्प यांच्या या निर्णयाचे अमेरिकेतून स्वागत झाले होते. पण गेल्या काही आठवड्यांपासून बायडेन प्रशासनाने सिरियात नव्याने तैनाती सुरू केल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेने राक्का शहरात लष्करी बॅरेक्स आणि धावपट्टी उभारली होती. त्यानंतर येथील तारीक अबयाद भागात अमेरिकेच्या जवानांनी गस्ती घातल्याची माहिती माध्यमांनी दिली होती. आत्ता राक्कामध्ये पहिला लष्करी तळ उभारून अमेरिका सिरियातील नव्या लष्करी मोहिमेचे संकेत देत आहेत. दरम्यान, सिरियातील अमेरिकेची सैन्यतैनाती बेकायदेशीर असल्याची टीका राष्ट्राध्यक्ष बाशर अल-अस्साद यांनी याआधी केली होती.

leave a reply