डॉलरचा हत्यारासारखा केलेला वापर अमेरिकेवरच बूमरँगसारखा उलटला आहे

- फ्रेंच विश्लेषक रेनॉद गिरार्ड

पॅरिस/वॉशिंग्टन- ‘अमेरिकेने राजकीय दबावतंत्राचे साधन म्हणून डॉलरचा प्रमाणाबाहेर वापर केला. त्यामुळे सध्या जगातील अधिकाधिक देश अमेरिकेचे वर्चस्व असलेल्या आर्थिक व्यवस्थेतून बाहेर पडत आहेत. स्थानिक चलनांचा वापर असणारी यंत्रणा हा डॉलरला पर्याय ठरतो. रशिया व चीनसारख्या देशांनी तर स्वतंत्र पेमेंट सिस्टिमही विकसित केली आहे’, या शब्दात फ्रेंच विश्लेषक रेनॉद गिरार्ड यांनी डॉलरच्या घसरणीबाबत बजावले. अमेरिकी विश्लेषक जॉन कार्नी यांनीही याला दुजोरा दिला असून डॉलरने राखीव चलन म्हणून असलेले स्थान गमावणे अपरिहार्य असल्याचा दावा केला.

डॉलरचा हत्यारासारखा केलेला वापर अमेरिकेवरच बूमरँगसारखा उलटला आहे - फ्रेंच विश्लेषक रेनॉद गिरार्डरशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका व मित्रदेशांनी रशियावर मोठ्या प्रमाणात निर्बंध टाकले. यात ‘स्विफ्ट’ या आंतरराष्ट्रीय यंत्रणेचा वापर करण्यावरील बंदीचाही समावेश होता. त्याला पर्याय म्हणून रशियाने रुबल चलनासह इतर आघाडीच्या चलनांचा वापर करण्याचा प्रस्ताव दिला होता. रशियाबरोबर व्यापार करणाऱ्या प्रमुख देशांनी सदर प्रस्ताव स्वीकारून त्याची अंमलबजावणीही सुरू केली होती. दुसऱ्या बाजूला चीनने आपल्या युआन चलनाचा हिस्सा वाढविण्यासाठी वेगाने पावले उचलली आहेत.

या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व अमेरिकेतील अभ्यासगटांनी अमेरिकी डॉलरबाबत गंभीर इशारा दिला होता. आंतरराष्ट्रीय व्यवहारांशी निगडीत व्यवस्थेत उलथापालथी होत असून काही देश परकीय गंगाजळीतील डॉलरचा हिस्सा कमी करण्याबाबत विचार करीत असल्याचे नाणेनिधीच्या वरिष्ठ अर्थतज्ज्ञांनी बजावले होते. डॉलरचा हत्यारासारखा केलेला वापर अमेरिकेवरच बूमरँगसारखा उलटला आहे - फ्रेंच विश्लेषक रेनॉद गिरार्डतर जगातील काही मध्यवर्ती बँका अमेरिकी डॉलरवर असलेले अवलंबित्व योग्य आहे, याबाबत फेरविचार करीत असल्याकडेही अमेरिकी अभ्यासगटाने लक्ष वेधले होते. आता जगातील इतर देशांचे अर्थतज्ज्ञ तसेच विश्लेषकांनीही अमेरिकी डॉलरच्या घसरणीची जाणीव करून देण्यास सुरुवात केली आहे. फ्रेंच विश्लेषकांचे वक्तव्य त्याचाच भाग ठरतो.

‘ले फिगारो’ या फ्रेंच दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत गिरार्ड यांनी डॉलरच्या घसरणीसाठी अमेरिकेची धोरणेच जबाबदार असल्याचा दावा केला. ‘अमेरिकेने गेल्या काही वर्षात सातत्याने डॉलरचा वापर राजकीय हत्यार म्हणून केला. या धोरणामुळे जागतिक चलन असलेल्या डॉलरला धक्का देण्यासाठी मोहिमेला पाठबळ मिळत गेले. अमेरिकी डॉलरचे स्थान एका रात्रीत संपणार नाही. पण डॉलरच्या घसरणीची प्रक्रिया आता रोखता येणार नाही’, असे गिरार्ड यांनी बजावले. डॉलरचा हत्यारासारखा केलेला वापर अमेरिकेवरच बूमरँगसारखा उलटला आहे - फ्रेंच विश्लेषक रेनॉद गिरार्डरशिया-युक्रेन युद्धात अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या राखीव गंगाजळीचा भाग असलेले अब्जावधी अमेरिकी डॉलर्स गोठविण्याचा निर्णय घेतला होता. ही घटना डॉलरच्या ‘वेपनायझेशन’चाच भाग असल्याकडे फ्रेंच विश्लेषकांनी लक्ष वेधले. या घटनेनंतर जगातील अनेक देशांनी त्यांच्या परकीय गंगाजळीतील डॉलरचा हिस्सा कमी करण्यास सुरुवात केल्याचे गिरार्ड यांनी सांगितले.

फ्रेंच विश्लेषकांनी अमेरिकी डॉलरसंदर्भात केलेल्या वक्तव्यांना अमेरिकेतूनही दुजोरा मिळत आहे. अमेरिकी विश्लेषक जॉन कार्नी यांनीही, जगातील सर्वात भक्कम मजबूत चलन असलेला डॉलर लवकरच आपले स्थान गमावेल, असा इशारा दिला. हा केवळ गंभीर धोका नसून ही बाब आता अपरिहार्य आहे, असे कार्नी यांनी स्पष्ट केले.

हिंदी English

 

leave a reply