तैवानच्या सुरक्षेसाठी पाश्चिमात्य देशांनी चीनला गंभीर परिणामांची धमकी द्यावी

नाटोच्या माजी प्रमुखांचे अमेरिका व युरोपिय देशांना आवाहन

taiwan tsai nato rasmussenतैपेई – युरोपिय देश आणि नाटोने तैवानच्या मुद्यावरुन चीनविरोधात अतिशय मुळमूळीत धोरण स्वीकारले आहे. रशियाने युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्याप्रमाणे चीन देखील तैवानवर हल्ला चढवू शकतो. त्यामुळे रशियाबाबतच्या चुकीची पुनरावृत्ती न करता, लोकशाहीवादी देशांनी तैवानच्या सुरक्षेसाठी चीनवर कठोर आर्थिक निर्बंध लादण्याची आधीच तयारी ठेवावी. तसेच चीनविरोधी युद्धासाठी तैवानच्या जवानांना लष्करी प्रशिक्षणही पुरवावे, असे आवाहन नाटोचे माजी प्रमुख आंद्रेस रासमुसेन यांनी केले.

us warship taiwan2009 ते 2014 यादरम्यान नाटोचे अध्यक्ष राहिलेल्या रासमुसेन यांनी तैवानचा दौरा करून राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांची भेट घेतली. यावेळी तैवानला अधिकाधिक लष्करी सहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आंद्रेस रासमुसेन यांनी स्पष्ट केले. तैवानच्या आखातातील धोक्याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाने पुरेसे लक्ष पुरविलेले नाही, अशी टीका रासमुसेन यांनी केली. तैवान कायमच चीनच्या आक्रमणाच्या धोक्याखाली राहिला असून लोकशाहीवादी तैवानच्या सुरक्षेची जबाबदारी इतर लोकशाहीवादी देशांनी घेण्याची आवश्यकता आहे.

येत्या काळात चीनने तैवानवर हल्ला चढविला तर त्याचे जागतिक स्तरावर पडसाद उमटू शकतात. त्यामुळे जागतिक हितसंबंध गुंतलेल्या लोकशाहीवादी देशांनी या क्षेत्रात संघर्ष पेटणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन रासमुसेन यांनी केले. अमेरिकेने तैवानचे प्रमुख लष्करी मित्रदेश म्हणून भूमिका बजावावी, तर युरोपिय व नाटो सदस्य देशांनी चीनविरोधात कठोर आर्थिक निर्बंधांची तयारी करावी. तैवानवर हल्ला चढविण्याआधी चीनला आपल्या निर्णयावर फेरविचार करावा लागेल, अशी निर्बंधांची भीती चीनमध्ये निर्माण व्हायला हवी, असे आवाहन रासमुसेन यांनी केले.

दरम्यान, अमेरिकेची बुर्के श्रेणीतील चूंग-हुन विनाशिकेने गुरुवारी तैवानच्या आखातातून प्रवास केला. 2023 सालात पहिल्यांदाच अमेरिकेच्या विनाशिकेने तैवानजवळून गस्त घातली आहे. तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी या गस्तीची पाहणी केल्याची माहिती समोर येत आहे. पण अमेरिकन विनाशिकेच्या गस्तीवर चीनने नेहमीप्रमाणे संताप व्यक्त केला.

leave a reply