‘उल्फा- आय’चा उपकमांडर द्रिष्टी राजखोवा शरण

राजखोवाशिलाँग – ‘युनायटेड लिब्रेरशन फ्रंट ऑफ आसाम – इंडिपेंडन्ट’ (उल्फा- आय) या ईशान्येकडील मुख्य अतिरेकी संघटनेचा उपकमांडर द्रिष्टी राजखोवा याने सुरक्षादलांसमोर शरणागती पत्करली आहे. . ‘उल्फा- आय’चा प्रमुख परेश बरुआ याच्यानंतर द्रिष्टी राजखोवा या संघटनेचा दुसऱ्या क्रमकांचा नेता होता. यामुळे उल्फासाठी हा फार मोठा झटका मानला जातो. गुप्तचर यंत्रणा गेली नऊ वर्षे राजखोवाच्या मागावर होत्या.

गेली तीन दशके ईशान्य भारतात अतिरेकी कारवाया करणाऱ्या ‘उल्फा’ संघटनेचे काही अतिरेकी याआधी शरण आलेहोते. तसेच या संघटनेच्या एका गट गेल्या दहावर्षांपासून सरकारसोबत शांती चर्चेत सहभागी झाला आहे. मात्र अहिंसेचा मार्ग सोडून देण्यास तयार नसलेला उल्फाचा कमांडर परेश बरुआ याने ‘उल्फा- आय’ नावाने आपला स्वतंत्र गट स्थापन केला होता. परेश बरुआ सध्या चीनमध्ये लपून बसला असून तेथूनच तो भारतविरोधी अतिरेकी कारवाया करीत असल्याचे अहवाल समोर आले होते. तसेच अधूनमधून तो भारतविरोधी वक्तव्य करीत असतो. मात्र त्याचा जवळचा साथीदार असलेला द्रिष्टी राजखोवा भारत आणि म्यानमारमधून अतिरेकी कारवायांचे नियंत्रण करीत होता.

राजखोवा

गेली नऊ वर्षांपासून लष्करच्या गुप्तचर यंत्रणेतर्फे (एमआय) राजखोवाचा माग काढला जात होता. राजखोवाचे नाव ईशान्य भारतातील अतिरेक्यांच्या मोस्ट वाँटेड यादीमध्ये होते. त्याचे आत्मसमर्पण ‘उल्फा-आय’साठी संघटनेसाठी मोठा धक्का मनाला जातो. राजखोवा सध्या लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या ताब्यात असून त्याला आसाम येथे आणण्यात आले आहे. त्याचे आत्मसमर्पण बंडखोरांचा बिमोड करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना मिळालेले मोठे यश म्हणून पाहिले जाते. त्याची अटक ही लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेच्या (एमआय) काही वर्षांच्या प्रयत्नांचे परिणाम आहेत, असे दावे केले जात आहेत.

राजखोवाबरॊबर त्याच्या चार साथीदारानांनीही आत्मसमर्पण केले आहे. एस. एस कॉरपोरल वेदांता, यासीन असोम, रोपज्योती असोम आणि मिथुन असोम अशी या चार अतिरेक्यांची नावे आहेत. या कारवाईत शस्त्रास्त्रांचा मोठा साठाही जप्त करण्यात आला आहे. दरम्यान ‘उल्फा-आय’चा प्रमुख परेश बरुआ याने आसाममधील एका लोकल टीव्ही वहिनीला फोन करून राजखोवा याने आजारी पत्नी आणि स्वतःच्या काही आरोग्य समस्यांमुळे शरणागती पत्करल्याच्या दावा केला आहे.

leave a reply