दोनशेहून अधिक बळी गेल्यानंतर सुदानमधील गटांमध्ये 24 तासांची संघर्षबंदी

- अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्याच्या पथकावर गोळीबार - युरोपिय महासंघाच्या राजदूतांवर हल्ला - रक्तपात थांबल्यानंतर सुदानच्या शहरांमध्ये लूटमार

खार्तूम – सुदानचे लष्कर आणि निमलष्करीदलात सुरू असलेल्या संघर्षात दोनशेहून अधिक जणांचा बळी गेला व 1800 जण जखमी झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला हा संघर्ष 24 तासांसाठी रोखण्यावर लष्कर व निमलष्करीदलात एकमत झाले. पण ही संघर्षबंदी फार काळ टिकणार नसल्याची चिंता व्यक्त केली जाते. दरम्यान, सुदानमधील अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्याच्या पथकावर गोळीबार झाला आहे. तर युरोपिय महासंघाच्या राजदूतांना हल्लेखोरांनी जबर मारहाण केली. या दोन्ही घटनांमुळे सुदानमधील परिस्थिती अजूनही नियंत्रणात नसल्याचे दिसत आहे.

दोनशेहून अधिक बळी गेल्यानंतर सुदानमधील गटांमध्ये 24 तासांची संघर्षबंदी - अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्याच्या पथकावर गोळीबार - युरोपिय महासंघाच्या राजदूतांवर हल्ला - रक्तपात थांबल्यानंतर सुदानच्या शहरांमध्ये लूटमारराजधानी खार्तूमसह मेरोव, पोर्ट सुदान, कसाला, गदारीफ, कोस्ती, दामाझीन, अल-फशेर आणि नायला या शहरांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून जोरदार संघर्ष सुरू आहे. लष्कर व निमलष्करीदलाने रणगाडे, तोफा तसेच हवाई हल्ल्यांचा वापर करुन एकमेकांच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. सुदानच्या रस्त्यांवर युद्ध सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचा दावा केला जातो.

सुदानमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेष प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार या संघर्षात 200 हून अधिक जणांचा बळी गेला. पण सुदानमधील गृहयुद्धातील बळींची संख्या याहून अधिक असल्याची शक्यता वर्तविण्यात येते. लष्कर आणि निमलष्करीदलाने संघर्षबंदी लागू करावी, असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघ व आफ्रिकन महासंघाने केले. दोनशेहून अधिक बळी गेल्यानंतर सुदानमधील गटांमध्ये 24 तासांची संघर्षबंदी - अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्याच्या पथकावर गोळीबार - युरोपिय महासंघाच्या राजदूतांवर हल्ला - रक्तपात थांबल्यानंतर सुदानच्या शहरांमध्ये लूटमारत्यानंतर दोन्ही गटांनी 24 तासांची संघर्षबंदी जाहीर केली.

पण मंगळवार संध्याकाळपासून ही संघर्षबंदी सुरू होणार आहे. तसेच 24 तासापुढे एक सेकंदही संघर्षबंदी वाढविली जाणार नसल्याचे दोन्ही गटांनी स्पष्ट केले. ही संघर्षबंदी सुरू होण्याआधी राजधानी खार्तूममध्ये अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्यांच्या पथकावर गोळीबार झाला. राजनैतिक अधिकारी यातून थोडक्यात बचावले. पण अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला. दोनशेहून अधिक बळी गेल्यानंतर सुदानमधील गटांमध्ये 24 तासांची संघर्षबंदी - अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्याच्या पथकावर गोळीबार - युरोपिय महासंघाच्या राजदूतांवर हल्ला - रक्तपात थांबल्यानंतर सुदानच्या शहरांमध्ये लूटमारतसेच अमेरिकन हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी सुदानमधील लष्कर तसेच निमलष्करीदल जबाबदार असल्याची आठवण ब्लिंकन यांनी करुन दिली.

या हल्ल्याला काही तास उलटत नाही तोच सुदानमधील युरोपिय महासंघाच्या राजदूतांवरही हल्ला झाला. हल्लेखोरांचे तपशील उघड होऊ शकलेले नाही. पण यामुळे सुदानमधील इतर देशांच्या राजनैतिक अधिकारी तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लष्कर-निमलष्करीदलातील संघर्षाबरोबरच सुदानच्या रस्त्यांवर माथेफिरूंनी लुटमार सुरू केली आहे. घरे, दुकाने लुबाडण्याच्या घटना वाढल्या आहेत. यानंतर भारताने सुदानमधील आपल्या नागरिकांना घरातच थांबण्याची सूचना केली आहे.

हिंदी

 

leave a reply