मेक्सिकोच्या स्थलांतरितांच्या केंद्राला लागलेल्या आगीत 39 जणांचा मृत्यू

मेक्सिको सिटी – सोमवारी रात्री अमेरिकेच्या सीमेजवळ मेक्सिकोतील स्थलांतरितांच्या केंद्राला लागलेल्या भीषण आगीत 39 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण सरकारने उभारलेल्या स्थलांतरितांच्या केंद्रांमधील परिस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मेक्सिकोबरोबरच अमेरिकेच्या सीमेवरील सदर केंद्रांच्या दुरावस्थेवर टीका होत आहे.

मेक्सिकोच्या स्थलांतरितांच्या केंद्राला लागलेल्या आगीत 39 जणांचा मृत्यूमेक्सिकोच्या किउदाद जुअरेझ शहराच्या उत्तरेकडील सीमेवर स्थलांतरितांसाठी केंद्र उभारण्यात आले होते. लॅटीन अमेरिकेतील स्थलांतरित मोठ्या संख्येने मेक्सिकोच्या सीमेतून अमेरिकेत घुसखोरी करीत असतात. त्याचबरोबर आशिया आणि आफ्रिकेतील स्थलांतरितांचाही यात समावेश असतो. स्थानिक सुरक्षा यंत्रणेने शहरातील रस्त्यांवरुन अशाच सुमारे 71 स्थलांतरितांना पकडून सदर केंद्रात आणले होते. त्यावेळी या केंद्रात आग भडकून दुर्घटना घडली. कोणत्या देशाचे किती स्थलांतरितांचा यात बळी गेला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवरील स्थलांतरितांचे वाढते लोंढे दोन्ही देशांच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हान ठरत आहेत.

हिंदी

 

leave a reply