रशियाकडून ‘सी ऑफ जपान’मध्ये सुपरसोनिक क्षेपणास्त्रांची चाचणी

टोकिओ – रशियाच्या पॅसिफिक फ्लिटने मंगळवारी दोन ‘मॉस्कीट’ सुपरसोनिक आणि विनाशिकाभेदी क्षेपणास्त्रांची चाचणी केली. 100 किलोमीटर अंतरावर ‘सी ऑफ जपान’मध्ये असलेले लक्ष्य आपल्या या क्षेपणास्त्रांनी यशस्वीरित्या भेदले, अशी माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. आपली ही क्षेपणास्त्रे आण्विक स्फोटके वाहून नेऊ शकतात, असेही रशियाने स्पष्ट केले.

रशियाकडून ‘सी ऑफ जपान’मध्ये सुपरसोनिक क्षेपणास्त्रांची चाचणीफोकिनो येथे रशियाच्या पॅसिफिक फ्लिटचे मुख्यालय आहे. या बंदर शहराजवळ असलेल्या ‘पीटर द ग्रेट’च्या आखातात रशियाच्या दोन विनाशिकांमधून क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण करण्यात आले. तसेच ही क्षेपणास्त्रे ज्या भागात कोसळली ते सागरी क्षेत्र आपल्या हद्दीत येत असल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयाने केला. जपानने देखील रशियाच्या या चाचणीविरोधात तक्रार नोंदविणार नसल्याचे म्हटले आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून रशियाने जपानजवळच्या सागरी क्षेत्रातील लष्करी हालचाली वाढविल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने लक्षात आणून दिले. गेल्याच आठवड्यात रशियाच्या अण्वस्त्रवाहू टीयू-95 बॉम्बर्स विमानांनी आमच्या हवाई क्षेत्रातून गस्त घातल्याची आठवण जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने करुन दिली.

हिंदी

leave a reply