डीआर काँगोत झालेल्या हल्ल्यात 42 जणांचा बळी

किन्शासा – काँगोच्या इतूरी प्रांतात बंडखोर गटाने चढविलेल्या हल्ल्यात 42 जणांचा बळी गेला. यामध्ये महिलांचाही समावेश होता, अशी माहिती समोर आली आहे. काँगोतील खनिजसंपत्तीवरील नियंत्रण आणि वांशिक वर्चस्ववादातून केल्या जाणाऱ्या या हल्ल्यांमध्ये स्थानिकांबरोबरच लष्करालाही लक्ष्य केले जाते.

डीआर काँगोत झालेल्या हल्ल्यात 42 जणांचा बळीडेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो अर्थात डीआरसी म्हणून प्रसिद्ध असलेल्या काँगोच्या पूर्वेकडील इतूरी प्रांतात ‘कोडेको’ या बंडखोर गटाने शुक्रवारी हल्ले चढविले. डुगू भागातील तीन गावांवर कोडेकोच्या बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात 42 जणांचा बळी गेला तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. कोडेकोच्या बंडखोरांचा तपास सुरू असून या संघटनेला लेंदू आणि झायरे या दोन गटांची साथ मिळाल्याची शक्यता वर्तविण्यात येते.

गेल्या महिन्यात नॉर्थ किवू प्रांतातील मुकोंदी गावात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 44 जणांचा बळी गेला होता. डीआर काँगोत झालेल्या हल्ल्यात 42 जणांचा बळीत्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात कोडेकोच्या बंडखोरानी केलेल्या हल्ल्यात 32 नागरिकांचा बळी गेला होता. गेल्या काही वर्षांपासून कोडेको बंडखोर संघटना आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी या संघटनेकडून येथील नागरी वस्त्यांना लक्ष्य करीत असल्याची टीका संयुक्त राष्ट्रसंघाने केली होती.

दरम्यान, काँगोमध्ये 120 हून अधिक सशस्त्र बंडखोर तसेच दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. डीआर काँगो हा खनिजसंपत्तीने समृद्ध देश असून कोबाल्टचा सर्वात मोठा साठा या देशात आहे. त्याव्यतिरिक्त सोने व हिऱ्याच्या खाणीही असून या खनिजसंपत्तीवर ताबा मिळविण्यासाठी या बंडखोर संघटनांमध्ये संघर्ष सुरू असतो. हा संघर्ष रोखण्यात लष्कर व इतर सुरक्षायंत्रणाही अपयशी ठरल्या आहेत.

हिंदी

 

leave a reply