बुर्किना फासोतील दहशतवादी हल्ल्यात 44 जण ठार

Burkina Fasoबुर्किना फासो – आफ्रिकेतील साहेल क्षेत्राचा भाग असणाऱ्या बुर्किना फासोत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 44 जणांचा बळी गेला आहे. कुराकोऊ व तोन्दोबी या दोन गावांमध्ये दहशतवादी गटांनी हल्ले केल्याची माहिती स्थानिक गव्हर्नरनी दिली. हल्ल्यानंतर लष्कराने संबंधित दहशतवादी गटावर कारवाई केल्याचेही सांगण्यात येते. आफ्रिकेतील खनिजसंपन्न देशांपैकी एक असलेला बुर्किना फासो गेल्या वर्षी एकापाठोपाठ झालेल्या दोन लष्करी बंडांमुळे चर्चेत आला होता. या बंडानंतर सत्ता हाती घेतलेल्या लष्कराने देशातील फ्रेंच लष्करी तुकड्यांची हकालपट्टी केली होती. त्यानंतर देशात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यांच्या घटना वाढू लागल्याचे समोर येत आहे.

शुक्रवारी नायजर या देशाच्या सीमेला लागून असलेल्या गावांमध्ये एकापाठोपाठ एक दहशतवादी हल्ले झाले. कुराकोऊमध्ये झालेल्या हल्ल्यात 31 जणांचा बळी गेला आहे. तर तोन्दोबीमध्ये 13 जण ठार झाल्याचे सांगण्यात येते. हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्यांची संख्या मोठी असून जीवितहानी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते.

हिंदी

leave a reply