चीनच्या 57 लढाऊ विमानांनी तैवानजवळून प्रवास केला

तैवानजवळून प्रवासबीजिंग/तैपेई – गेल्या चोवीस तासात चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या 57 लढाऊ विमाने आणि चार विनाशिकांनी तैवानजवळून प्रवास केला. यावेळी प्रत्यक्ष युद्धाचा सराव पार पडल्याचे चीनच्या ‘ईस्टर्न थिअटर कमांड’ने जाहीर केले. त्याचबरोबर चीनने तैवानच्या विरोधात लष्कर तैनाती केल्याच्या बातम्याही येत आहेत. अमेरिकेच्या युद्धनौकेने तैवानच्या आखातातून केलेला प्रवास आणि जर्मन-लिथुआनियाच्या नेत्यांनी तैवानला दिलेल्या भेटीमुळे संतापलेल्या चीनने ही लष्करी आक्रमकता दाखविल्याचा दावा केला जातो.

तैवानजवळून प्रवासगेल्या आठवड्यात अमेरिकेच्या युद्धनौकेने तैवानच्या आखाताजवळून प्रवास केला होता. तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी अमेरिकन युद्धनौकेच्या या सफरीची पाहणी केली होती. त्याच दिवशी नाटो या लष्करी संघटनेचे माजी प्रमुख आंद्रेस रासमुसेन यांनी तैवानचा दौरा केला होता. तर काही तासांपूर्वी जर्मनी व लिथुआनियाच्या संसद सदस्यांनी तैवानला भेट दिली. यामध्ये जर्मन संसदेच्या संरक्षण समितीच्या प्रमुखांचा समावेश आहे.

चीनच्या लष्करी हालचालींमुळे तैवानचे आखात व आसपासच्या सागरी क्षेत्रातील शांतता व स्थैर्य हरवल्याचा आरोप युरोपिय देशांच्या नेत्यांनी केला आहे. लवकरच जर्मन संसद नेते तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांची भेट घेणार आहेत. युरोपिय नेत्यांच्या या दौऱ्यामुळे आणि अमेरिकन युद्धनौकेच्या प्रवासामुळे संतापलेल्या चीनने रविवार सकाळ सहा ते सोमवार सकाळ सहा, अशा चोवीस तासांच्या कालावधीत 57 विमाने आणि चार विनाशिका रवाना केल्या.

रविवारपासून चीनच्या हवाई व नौदलाने तैवानच्या आखाताजवळ मोठा युद्धसराव सुरू केला आहे. याच सरावात सहभागी झालेली विमाने आणि विनाशिकांनी तैवानच्या हद्दीजवळून प्रवास करून तैवानसह पाश्चिमात्य देशांना इशारा दिल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.

हिंदी

leave a reply