मालीतील लष्करी कारवाईत ६० दहशतवादी ठार

- लष्करी तळानजिक झालेल्या स्फोटांमध्ये १० जणांचा बळी

बमाको – एकापाठोपाठ झालेले बंड व फ्रेंच लष्करी पथकांच्या हकालपट्टीमुळे चर्चेत आलेल्या मालीच्या लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. शनिवारी मध्य मालीतील मोप्टी प्रांतात केलेल्या कारवाईत सुमारे ६० दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली. ही कारवाई होत असतानाच सेव्हर भागात झालेल्या स्फोटांमध्ये १० नागरिकांचा बळी गेला असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते.

मालीतील लष्करी कारवाईत ६० दहशतवादी ठार - लष्करी तळानजिक झालेल्या स्फोटांमध्ये १० जणांचा बळीसाहेल क्षेत्राचा भाग असलेल्या मालीत गेल्या दशकापासून दहशतवादी संघटना मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या आहेत. मालीतील काही भाग दहशतवादी गटांच्या ताब्यात असल्याचेही मानले जाते. या दहशतवाद्यांमध्ये अल कायदा व ‘आयएस’ अशा दोन्ही संघटनांशी संबंधित गटांचा समावेश आहे. लष्कराने दहशतवादी गटांविरोधात व्यापक मोहीमा राबविल्या असल्या तरी त्याला मर्यादित यश मिळाले आहे.

मालीतील दहशतवादविरोधी कारवायांमध्ये यापूर्वी फ्रान्सचाही सहभाग होता. मात्र लष्करी बंडानंतर आलेल्या राजवटीने फ्रेंच लष्कराची देशातून हकालपट्टी केली आहे.

leave a reply