इस्रायल, मोरोक्कोमध्ये ६० कोटी डॉलर्सचा संरक्षण करार

६० कोटी डॉलर्सचा संरक्षण करारजेरुसलेम – इस्रायल सोबत अब्राहम करारात सहभागी झालेल्या युएई, बहारीन यांच्यापाठोपाठ आता मोरोक्कोनेही इस्रायलशी संरक्षण करार केला. मोरोक्कोने हवाई सुरक्षा यंत्रणेच्या खरेदीसाठी ‘इस्रायली एरोस्पेस इंडस्ट्रीज-आयएआय’बरोबर ६० कोटी डॉलर्सचा संरक्षण करार केला आहे. या अंतर्गत मोरोक्को इस्रायलकडून बराक क्षेपणास्त्रे खरेदी करील. शेजारी देश अल्जेरियाकडून वाढत असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मोरोक्कोने या यंत्रणेची खरेदी केल्याचे बोलले जाते.

६० कोटी डॉलर्सचा संरक्षण करारइस्रायली वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, मोरोक्को ‘आयएआय’कडून बराक-एमएक्स ही हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी करणार आहे. बराक-एमएक्सचा वापर ड्रोन, हेलिकॉप्टर, विमाने तसेच क्षेपणास्त्रे भेदण्यासाठीही केला जातो. बराक-एमएक्स ही हवाई सुरक्षा यंत्रणा तीन प्रकारात वर्गीकृत केली आहे. या यंत्रणेचे इंटरसेप्टर ३५, ७० तसेच १५० किलोमीटर अंतरावरचे लक्ष्य भेदू शकतात. तसेच शत्रूची क्रूज आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे सदर हवाई यंत्रणा टिपू शकते.

इस्रायलचे संरक्षण मंत्री बेनी गांत्झ यांनी नोव्हेंबर महिन्यात मोरोक्कोला भेट दिली होती. या भेटीतच बराक-एमएक्सच्या खरेदीबाबत सामंजस्य करार झाला होता. त्यानंतर आयएआयचे सीईओ बोआझ लेवी आणि इस्रायलचे माजी संरक्षणमंत्री आमिर पेरेज यांनी मोरोक्कोचा छुपा दौरा करून या करारा संबंधी उर्वरित सोपस्कार पार पाडले ६० कोटी डॉलर्सचा संरक्षण करारहोते. २०२० साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने मोरोक्कोने इस्रायलला मान्यता दिली व मोरोक्को अब्राहम करारात सहभागी झाला होता. त्यानंतर इस्रायल व मोरोक्कोमध्ये संरक्षणविषयक सहकार्य सुरू झाले. गेल्या वर्षीच मोरोक्कोने इस्रायलकडून ‘स्कायलॉक डोम’ अशी ड्रोनभेदी यंत्रणा खरेदी केली होती.

उत्तर आफ्रिकेत शेजारी देश असलेल्या अल्जेरिया आणि मोरोक्को यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून तणाव वाढत आहे. अल्जेरियाने काही आठवड्यांपूर्वीच मोरोक्कोवर युद्ध गुन्ह्यांचा आरोप केला होता. तर अल्जेरिया ड्रोनचा वापर करून आपल्या सीमेत हल्ले चढविण्याच्या तयारीत असल्याचा ठपका मोरोक्कोने ठेवला होता. अल्जेरियापासून असलेल्या या धोक्यांच्या पार्श्‍वभूमीवर, मोरोक्कोने काही आठवड्यांपूर्वी स्पेनकडून जवळपास साडेतीन कोटी डॉलर्सची शस्त्रे खरेदी केली होती.

दरम्यान, मोरोक्कोने इस्रायल बरोबर अब्राहम करार केल्यानंतर अल्जेरियाने इराणबरोबरच्या सहकार्यात वाढ केली होती.

leave a reply