अमेरिकी डॉलरविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत सोन्याची भूमिका महत्त्वाची

- अमेरिकी गुंतवणूकदार व अर्थतज्ज्ञ रुचिर शर्मा

वॉशिंग्टन – ‘जगभरात गुंतवणुकीसाठी वापरण्यात येणारी सर्वात जुनी व पारंपारिक मालमत्ता म्हणून सोने ओळखण्यात येते. जगातील मध्यवर्ती बँकांकडून सध्या या सोन्याचा वापर अमेरिकी डॉलरविरोधात बंडाचे माध्यम म्हणून करण्यात येत आहे. यापूर्वी डॉलर व सोने या दोन्ही गोष्टी गुंतवणुकीसाठी सुरक्षित घटक म्हणून प्रसिद्ध होत्या. पण आता सोने अधिक सुरक्षित मानले जाते’, असा दावा अमेरिकी गुंतवणूकदार व अर्थतज्ज्ञ रुचिर शर्मा यांनी केला. अमेरिका व सहकारी देशांकडून निर्बंधांचा शस्त्रासारखा होणारा वापर हे सोन्याकडील कल वाढण्यामागचे मुख्य कारण ठरल्याकडेही शर्मा यांनी लक्ष वेधले.

अमेरिकी डॉलरविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत सोन्याची भूमिका महत्त्वाची - अमेरिकी गुंतवणूकदार व अर्थतज्ज्ञ रुचिर शर्मारुचिर शर्मा अमेरिकेतील ‘रॉकफेलर कॅपिटल मॅनेजमेंट’ या कंपनीचे प्रमुख असून त्यापूर्वी त्यांनी ‘मॉर्गन स्टॅन्ले’ या आघाडीच्या वित्तसंस्थेतही महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. काही वर्षांपूर्वी त्यांनी ‘ब्रेकआऊट कॅपिटल’ या गुंतवणूक कंपनीचीही स्थापना केली आहे. ‘टॉप ग्लोबल थिंकर्स’च्या यादीत असणाऱ्या शर्मा यांनी जागतिक अर्थव्यवस्थेच्या मुद्यावर चार पुस्तके लिहिली असून ते ‘उगवत्या अर्थव्यवस्था’ या विषयातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.

काही दिवसांपूर्वी ‘फायनान्शिअल टाईम्स’ या आघाडीच्या दैनिकात लिहिलेल्या लेखात त्यांनी सोन्याचा वापर अमेरिकी डॉलरविरोधात होत असल्याचा दावा केला. ‘गेल्या सहा महिन्यात सोन्याचे दर 20 टक्क्यांनी वाढले आहेत. अमेरिकी डॉलरविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत सोन्याची भूमिका महत्त्वाची - अमेरिकी गुंतवणूकदार व अर्थतज्ज्ञ रुचिर शर्मासोन्याची मागणी वाढण्यामागे फक्त छोटे मोठे गुंतवणूकदार कारणीभूत नाहीत. जगातील मध्यवर्ती बँका सोन्याच्या सर्वात मोठ्या खरेदीदार ठरल्या आहेत. या मध्यवर्ती बँकांनी त्यांच्याकडील डॉलरचा हिस्सा कमी केला असून सुरक्षित पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे’, याची जाणीव शर्मा यांनी आपल्या लेखात करुन दिली.

‘सोन्याच्या खरेदीसाठी असलेल्या वाढत्या उत्साहामुळे सोन्याचे दर विक्रमी पातळीच्या नजिक पोहोचले आहेत. अमेरिकी डॉलरविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत सोन्याची भूमिका महत्त्वाची - अमेरिकी गुंतवणूकदार व अर्थतज्ज्ञ रुचिर शर्माव्याजदरांवर आधारित भाकितांचा विचार करता अपेक्षित असलेल्या दरांपेक्षा सोन्याच्या दरांमध्ये 50 टक्के अधिक वाढ दिसून आली आहे. कोणती तरी नवी गोष्ट सोन्याच्या वाढत्या दरांना प्रोत्साहन देणारी ठरते आहे’, या शब्दात शर्मा यांनी सोन्याच्या दरवाढीबाबत आपली भूमिका मांडली.

जागतिक राखीव चलन म्हणून अमेरिकी डॉलरला दुसरा कोणताही पर्याय नाही, हा अतिआत्मविश्वास अमेरिकेसाठी धोकादायक ठरु शकतो, असा इशाराही रुचिर शर्मा यांनी दिला. अमेरिकी डॉलरसाठी ‘लास्ट लाईन ऑफ डिफेन्स’ चीनची राजवट असल्याचे शर्मा यांनी सांगितले. ‘डॉलरला सोने व डिजिटल करन्सीकडून आव्हान मिळत असताना त्यावर असलेला विश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अमेरिकेने आर्थिक महाशक्ती म्हणून असलेले आपले स्थान गृहित धरणे टाळावे’, असा सल्लाही ‘रॉकफेलर कॅपिटल मॅनेजमेंट’च्या प्रमुखांनी दिला आहे.

leave a reply