सौदीच्या राजघराण्यातील १५० जणांना कोरोनाव्हायरसची लागण

रियाध – सौदीच्या राजघराण्यातील १५० जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. सौदीचे राजे सलमान आणि क्राऊन प्रिन्स मोहम्मद बीन सलमान यांनी स्वतःला इतरांपासून वेगळे ठेवण्याची आवश्यक ती खबरदारी घेतल्याचे दिसत आहे. “न्यूयॉर्क टाइम्स” या अमेरिकी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. आतापर्यंत सौदी अरेबियात कोरोनाव्हायरसच्या साथीने ४१ जणांचा बळी घेतला असून २९००हून अधिकजणांना याची लागण झाली आहे.

प्रिन्स फैसल बीन बंदार बीन अब्दुल अझीझ अल सौद यांच्यासह राजघराण्यातील १५० सदस्यांना या साथीची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर या सर्वांना रियाधमधल्या किंग फैझल रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. राजघराण्यातील बहुतांश सदस्य युरोपीय देशांना भेट देतात, तिथूनच ही साथ राजघराण्यापर्यंत पोहोचली असावी, अशी शक्यता वर्तवली जाते. दरम्यान, राजघराण्यातील सदस्यांसाठी किंग फैझल हॉस्पिटलमध्ये ५०० बेडचा स्वतंत्र कक्ष बनविण्यात आले आहेत, अशी माहिती या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली आहे.

सौदी अरेबियामध्ये कोरोनाव्हायरसच्या साथीत ४१जण दगावले असून २९०० हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आखातातील इतर देशांमध्येही कोरोना व्हायरसचा फैलाव वाढत चालला असून या देशांनीही ही साथ रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

leave a reply