पोलंड तुर्कीकडून 24‘कॉम्बॅट ड्रोन्स’ खरेदी करणार

अंकारा/वॉर्सा – पोलंडने तुर्कीकडून 24 ‘बेरक्तर टीबी2 कॉम्बॅट ड्रोन्स’ खरेदी करणार आहे. सोमवारी अंकारामध्ये झालेल्या एका बैठकीत यासंदर्भातील करारावर स्वाक्षर्‍या झाल्या. तुर्कीकडून लढाऊ ड्रोन्सची खरेदी करणारा पोलंड हा नाटो तसेच युरोपिय मंहासंघातील पहिला देश ठरला आहे. यापूर्वी तुर्कीने कतार, अझरबैजान व युक्रेन या तीन देशांना ‘बेरक्तर टीबी2 कॉम्बॅट ड्रोन्स’ पुरविले आहेत.पोलंड तुर्कीकडून 24‘कॉम्बॅट ड्रोन्स’ खरेदी करणार

पोलंडचे राष्ट्राध्यक्ष अँड्रेज डुडा सध्या तीन दिवसांच्या तुर्कीच्या दौर्‍यावर आहेत. सोमवारी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत पोलंडने ड्रोन्सच्या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी एर्दोगन यांनी ड्रोन्सच्या निर्मितीत तुर्की जगातील तीन ते चार आघाडीच्या देशांपैकी एक आहे, असा दावा केला. तुर्की निर्यात करीत असलेले ड्रोन्स यापूर्वी सिरिया, लिबिया तसेच ‘अझरबैजान-आर्मेनिया’ संघर्षात वापरण्यात आले होते.पोलंड तुर्कीकडून 24‘कॉम्बॅट ड्रोन्स’ खरेदी करणार

यावेळी पोलंडच्या राष्ट्राध्यक्षांनी तुर्की हा आपला या क्षेत्रातील सर्वात मजबूत सहकारी असल्याचाही दावा केला. नाटोच्या चौकटीत राहून पोलंड व तुर्की परकीय धोक्यांचा मुकाबला करतील, असेही राष्ट्राध्यक्ष डुडा यांनी यावेळी स्पष्ट केले. तर तुर्कीने आपली ‘एफ-16’ विमाने बाल्टिक क्षेत्रात गस्त घालण्यासाठी लवरकच पोलंडमध्ये दाखल होतील, असे संकेत दिले आहेत. पोलंड व रशियामध्ये असणारा तणाव पाहता तुर्कीने दिलेले हे संकेत लक्ष वेधून घेणारे ठरतात.

leave a reply