इटलीमधील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची खरी संख्या दसपट अधिक असू शकते – इटलीतील संस्थेचा दावा

रोम/माद्रीद जगभरात कोरोनाव्हायरसची जवळपास चार लाख जणांना लागण झाली असून १७ हजाराहून अधिक जणांचा बळी गेला आहे. एकट्या इटलीत ६३,९२७ जण या विषाणूने बाधित आहेत तर ६,०७७ जणांचा यात बळी गेला आहेपण इटलीतील संस्थेने केलेल्या दाव्यानुसार, या देशातील नोंद न झालेल्या कोरोनाव्हायरसग्रस्त रुग्णांची संख्या दहापट अधिक असू शकते. इटलीच्या मिलान शहरातील नर्सने, आम्ही मृतांची गणती करणे सोडून दिल्याची हताश प्रतिक्रीया दिली होती. त्या पार्श्वभूमीवर इटलीच्याच संस्थेने केलेल्या दाव्याचे गांभीर्य वाढले आहे

युरोपात गेल्या चोवीस तासात हजाराहून अधिक जणांचा बळी गेला आहे. तर या साथीचे युरोपातील केंद्र बनलेल्या इटलीतील परिस्थिती अधिकच भीषण बनली आहे. गेल्या चोवीस तासात या देशात ६०१ जणांचा बळी गेला आहे. ज्यांची चाचणी झालेली नाही अश्यांची संख्या ६,४०,००० वर असू शकते, असे सांगून इटलीच्या नागरी सुरक्षा संस्थेचे प्रमुख अँजेलो बोरेली यांनी नवी खळबळ माजवली आहे

इटलीची जनता ‘लॉकडाऊन’चे आदेश जुमानत नसल्याची तक्रार इटलीतील काही मेयर्स करीत आहेदर दिवशी शेकडो बळी जात असताना देखील नागरिकांना परिस्थितीचे गांभीर्य कळलेली नाही, अशी खन्त कॅम्पानिया, रेयियो कॅलाब्रिया, लुझेरा या शहरांच्या मेयर्सनी व्यक्त केली आहे. स्पेनमध्ये देखील कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या चोवीस तासात ५१४ जणांचा बळी गेला आहेया साथीच्या रुग्णांच्या तपासणीसाठी आर्टिफिशल इंटेलिजंसने तयार केलेल्या रोबोट्सचा वापर करणार असल्याचे स्पेनने जाहीर केले.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी जनतेला निर्वाणीचा इशारा दिला आहे. दिवसातून एकदा फक्त एकाच कारणासाठी बाहेर पडता येईल. या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे जॉनसन सरकारने बजावले आहेउत्तर आफ्रिकेतील अल्जेरीयामध्ये या विषाणूने १७ जणांचा बळी घेतला असून २३० रूग्ण आहेत. तर दक्षिण आफ्रिकेतील ५५४ जणांना याची लागण झाली असून दक्षिण आफ्रिकेने पुढील तीन आठवड्यांसाठी लॉकडाउन जाहीर केला आहे.

leave a reply