हायपरसोनिक क्षेपणास्त्रांसह रशियन विनाशिका ‘ॲडमिरल गोर्शकोव्ह’च्या तैनातीची घोषणा

frigate Admiral Gorshkovमॉस्को – ‘झिरकॉन’ या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा समावेश असलेली ‘ॲडमिरल गोर्शकोव्ह’ ही विनाशिका ‘कॉम्बॅट ड्यूटी’साठी तैनात करण्यात येत असल्याची घोषणा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केली. रशियाने ‘प्रोजेक्ट 22350’अंतर्गत या बहुउद्देशीय युद्धनौकेची उभारणी केली असून सध्या ही युद्धनौका रशियन नौदलाच्या ‘नॉर्दर्न फ्लीट’चा भाग आहे. बुधवारी राष्ट्राध्यक्ष पुतिन व संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात ‘ॲडमिरल गोर्शकोव्ह’ तैनात करण्यात येत असल्याचे जाहीर केले.

‘ॲडमिरल गोर्शकोव्ह’ अटलांटिक महासागर, भूमध्य समुद्र व हिंदी महासागरातून प्रवास करणार असून रशियन हितसंबंधांची सुरक्षा हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट असेल, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी स्पष्ट केले. सुमारे साडेचार हजार टनांच्या या विनाशिकेचा वेग 29 नॉटस्‌‍ इतका असून यावरील झिरकॉन या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांची तैनाती महत्त्वाची ठरते. या क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली ही पहिलीच रशियन विनाशिका ठरते. याव्यतिरिक्त ‘ॲडमिरल गोर्शकोव्ह’ ‘कॅलिबर-एनके क्रूझ मिसाईल सिस्टिम’ तसेच ‘पॉलिमेंट-रेडट एअर डिफेन्स सिस्टिम’ व टॉर्पेडोज्‌‍नी सज्ज आहे.

leave a reply