अफगाणिस्तानातील स्फोटात 10 ठार

kabul blastकाबुल – अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये रविवारी सकाळी झालेल्या बॉम्बस्फोटात 10 ठार ते आठ जण जखमी झाले. येथील लष्करी विमानतळाला लक्ष्य करून हा स्फोट घडविण्यात आला होता.

काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असणाऱ्या लष्करी तळावर हा हल्ला झाला. तीन दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील तखार भागात झालेल्या स्फोटात तीन जणांचा बळी गेला होता. या दोन्ही स्फोटांची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पण ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेवर या स्फोटासाठी संशय व्यक्त कला जातो.

अफगाणिस्तानातील दहशतवादी हल्ल्यांची तीव्रता वाढली असून यासाठी तालिबानची धोरणे जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. तसेच या हल्ल्यांमुळे अफगाणिस्तानचे स्थैर्य धोक्यात येत असल्याचा दावा या देशाचे माजी लष्करी अधिकारी करीत आहेत.

तालिबानने वेळीच हे दहशतवादी हल्ले रोखले नाहीत, संबंधित संघटनांवर कारवाई केली नाही तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल. यामुळे अफगाणिस्तानचेच नाही तर या साऱ्या क्षेत्राचे स्थैर्य देखील बाधित होईल, असा इशारा या माजी लष्करी अधिकाऱ्याने दिला आहे.

हिंदी

leave a reply