सुलेमानीच्या हत्येचा सूड अजूनही इराणच्या अजेंड्यावर

इराणचे संरक्षणदलप्रमुख मेजर जनरल हुसेन बाकेरी

soleimaniतेहरान – इराणच्या कुद्स फोर्सेसचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल कासेम सुलेमानी यांच्या हत्येचा सूड अजूनही प्रतिक्षेत आहे. सुलेमानी यांची हत्या करणारे आणि त्याचे आदेश देणाऱ्यांवर कारवाई अजूनही इराणच्या अजेंड्यावर आहे. इराणला याचा अजिबात विसर पडलेला नाही, अशी घोषणा इराणचे संरक्षणदलप्रमुख मेजर जनरल मोहम्मद हुसेन बाकेरी यांनी केली.

इराकच्या बगदाद विमानतळाबाहेर सुलेमानी यांच्यावर झालेल्या ड्रोन हल्ल्याला मंगळवारी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली सेंटकॉमने ड्रोन हल्ल्याद्वारे सुलेमानी यांना ठार केले होते. यानंतर इराणमधून संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या. इराणने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासह वरिष्ठ नेते, लष्करी अधिकारी यांच्यावर हल्ले चढविण्याच्या धमक्या दिल्या होत्या. दरम्यान, सुलेमानी यांच्या हत्येमध्ये इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’चा समावेश असल्याचा आरोपही इराणने केला होता.

हिंदी English

leave a reply