ऑस्ट्रेलिया हमासला दहशतवादी संघटनांच्या यादीत सामील करणार

- इस्रायलकडून निर्णयाचे स्वागत

सिडनी/जेरूसलेम – अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायल यांच्यानंतर ऑस्ट्रेलिया देखील गाझापट्टीतील ‘हमास’ला दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकणार आहे. यातून हमासच्या राजकीय संघटनेलाही वगळणार नसल्याचे ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून ऑस्ट्रेलियाने दहशतवादाच्या विरोधात योग्य पाऊल उचलल्याचे म्हटले आहे.

आत्तापर्यंत इस्रायलसह अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, जपान या देशांनी तसेच युरोपिय महासंघाने हमासच्या ‘अल कासम ब्रिगेड’ या लष्करी तसेच राजकीय गट, अशा दोघांनाही दहशतवादी संघटना घोषित केले होते. तर ऑस्ट्रेेलियाने फक्त अल कासम ब्रिगेडलाच दहशतवादी ठरविले होते. ऑस्ट्रेलियाप्रमाणे न्यूझीलंड आणि पॅराग्वे या देशांनीही हीच भूमिका ठेवली आहे. पण हमासची विचारसरणी कदापि मान्य करता येणार नसल्याचे सांगून ऑस्ट्रेलियाच्या अंतर्गत सुरक्षामंत्री कॅरेन अँड्य्रूज् यांनी हमासला पूर्णपणे दहशतवादी संघटना घोषित केले. हमासच्या हिंसक विचारसरणीला ऑस्ट्रेलियामध्ये थारा नसल्याचे कॅरेन म्हणाल्या. याचा थेट परिणाम ऑस्ट्रेलियातील हमासच्या राजकीय गटावर आणि संबंधित व्यक्तींवर होऊ शकतो. हमाससाठी ऑस्ट्रेलियातून जमा होणार्‍या निधीवर कारवाई होऊ शकते.

leave a reply