अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल

- राजकीय छळाचा प्रकार असल्याचा ट्रम्प यांचा ठपका

वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर (विद्यमान अथवा माजी) गुन्हा दाखल होण्याची इतिहासातील ही पहिलीच घटना ठरते. 2016 सालच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीचा प्रचार सुरू असताना म्प यांच्याकडून एका मॉडेलला तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे देण्यात आल्याचे न्यूयॉर्कमधील ‘मॅनहटन डिस्क्टि ॲटर्नीं’नी आपल्या आरोपात म्हटले आहे. ट्रम्प यांनी आपल्यावरील आरोप नाकारले असून हा राजकीय छळ व निवडणुकीतील हस्तक्षेपाचा प्रकार असल्याचा दावा केला.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल - राजकीय छळाचा प्रकार असल्याचा ट्रम्प यांचा ठपकागेल्या काही महिन्यांमध्ये बायडेन प्रशासनाने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कायदेशीर पातळीवर अडचणीत आणण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. ट्रम्प यांच्या आर्थिक व्यवहारांसह टॅक्स रिटर्न्स, 2020 सालच्या निवडणुकांवरून केलेली वक्तव्ये तसेच कॅपिटल हिलवर झालेला हिंसाचार अशा विविध प्रकरणांमध्ये चौकशी सुरू करण्यात आली आहे.

शुक्रवारी न्यूयॉर्क प्रांतातील ‘मॅनहटन डिस्क्टि ॲटर्नी’ ॲल्विन ब्रॅग यांनी ग्रँड ज्युरीसमोर आरोपपत्र दाखल केले. डोनाल्ड म्प यांचे 2006 साली आपल्याबरोबर अफेअर होते, असा दावा अमेरिकेतील एका मॉडेलने केला होता. याची संबंधित मॉडेलने कुठेही वाच्यता करु नये यासाठी ट्रम्प यांचे माजी वकील मायकल कोहेन यांच्यामार्फत एक लाख तीस हजार डॉलर्स देण्यात आले. 2019 साली झालेल्या चौकशीत कोहेन यांनी ही बाब मान्य केली होती. मॉडेलला दिलेले पैसे निवडणूक प्रचारासाठी वापरलेला निधी म्हणून दाखविण्यात आले. याप्रकरणी ‘मॅनहटन डिस्क्टि ॲटर्नी’च्या कार्यालयाने तपास करून ट्रम्प यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल - राजकीय छळाचा प्रकार असल्याचा ट्रम्प यांचा ठपकाअमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळासह माध्यमांमध्ये तसेच सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ट्रम्प यांनी हा राजकीय छळ असल्याचा दावा केला. रिपब्लिकन पक्षाचे गव्हर्नर रॉन डेसँटिस यांनी, ट्रम्प यांच्याविरोधातील आरोपपत्र म्हणजे न्यायव्यवस्थेचे ‘वेपनायझेशन’ असल्याचा ठपका ठेवला. अमेरिकेचे माजी उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनीही राजकीय सूडबुद्धिने प्रेरित कारवाई असल्याची टीका केली आहे.

आरोपपत्र दाखल झाल्यानंतर पुढील आठवड्यात म्प यांना न्यायालयासमोर दाखल व्हावे लागणार असून त्यांना औपचारिक अटक होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. ट्रम्प मंगळवारी न्यायालयासमोर आत्मसमर्पण करतील, असे त्यांच्या निकटवर्तियांकडून सांगण्यात आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ट्रम्प यांच्याविरोधात दाखल झालेल्या आरोपपत्रावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

leave a reply