जगावर प्रभाव गाजविण्यासाठी चीनकडे असलेली वेळ संपत आली आहे

- अमेरिकी विश्‍लेषकांचा दावा

वॉशिंग्टन/बीजिंग – जागतिक महासत्ता होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍या चीनकडे त्यासाठी मुळात फारसा वेळ राहिला नसल्याचा दावा अमेरिकी विश्‍लेषकांनी केला आहे. अमेरिकेसह जगातील अनेक देशांना चीनने विविध क्षेत्रात पिछाडीवर सोडले असले, त्याच्या प्रगतीचा वेग आता थांबला असल्याचे विश्‍लेषकांनी म्हटले आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेची मोठी घसरण सुरू असून देश वेगाने एकाधिकारशाहीकडे जात असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

जगावर प्रभाव गाजविण्यासाठी चीनकडे असलेली वेळ संपत आली आहे - अमेरिकी विश्‍लेषकांचा दावामायकल बेकली व हॅल ब्रँडस् यांनी, फॉरेन अफेअर्स या वेबसाईटसाठी लिहिलेल्या लेखात, चीनला जगाची पुनर्रचना करायची असल्याचा दावा केला आहे. मात्र त्यासाठी हवा असलेला आवश्यक वेळ त्यांच्या हातून निघून चालल्याचे विश्‍लेषकांनी बजावले आहे. चीनमध्ये नैसर्गिक स्रोतांची टंचाई निर्माण झाली असून, लोकसंख्येतही घसरण झाल्याकडे बेकली व ब्रॅड्स यांनी लक्ष वेधले आहे. त्याचवेळी ज्या आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सहकार्याच्या बळावर चीनने प्रगती साधली तोच समुदाय आता चीनचे स्वागत करण्यास तयार नसल्याची जाणीव लेखात करून देण्यात आली आहे.

जगावर प्रभाव गाजविण्यासाठी चीनकडे असलेली वेळ संपत आली आहे - अमेरिकी विश्‍लेषकांचा दावातीन दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या चीनच्या प्रगतीला गेल्या दशकापासूनच धक्के बसण्यास सुरुवात झाली असून त्याच्यापुढील समस्या अधिकाधिक वाढतच चालल्याचे ‘फॉरेन अफेअर्स’मधील लेखात म्हटले आहे. चीन महासत्ता असली तरी आता आहे त्यापेक्षा त्याची अधिक प्रगती होणार नाही व या देशाची उतरण सुरू झाल्याचा दावा विश्‍लेषकांनी केला आहे. चीनचे नेतृत्त्व ज्या काही विस्तारवादी व आक्रमक हालचाली करीत आहे, त्यामागे हातून निसटत चाललेली वेळ हा महत्त्वाचा घटक असू शकतो, असेही अमेरिकी विश्‍लेषकांनी बजावले आहे.जगावर प्रभाव गाजविण्यासाठी चीनकडे असलेली वेळ संपत आली आहे - अमेरिकी विश्‍लेषकांचा दावा

दरम्यान, चीनकडील परकीय गंगाजळीत घट होत असल्याचे वृत्तही समोर आले आहे. अवघ्या एका महिन्यात चीनच्या परकीय गंगाजळीत ३१.५ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. चीनकडील परकीय गंगाजळी सध्या ३.२०१ ट्रिलियन डॉलर्स इतकी झाली असून ही एप्रिल महिन्यानंतरची नीचांकी पातळी असल्याचे सांगण्यात येते.

leave a reply