अफगाणिस्तानातील लिथिअमच्या खाणीत चीन मोठी गुंतवणूक करणार

- १० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची तयारी

काबुल – अफगाणिस्तानातील खनिजसंपत्तीचा ताबा मिळविण्यासाठी उत्सूक असलेल्या चीनने तालिबानच्या राजवटीला जबरदस्त प्रस्ताव दिला. येथील लिथिअमच्या उत्खननासाठी चीन अफगाणिस्तानात १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. ‘खामा प्रेस’ या स्थानिक वृत्तसंस्थेने हा दावा केला. काही तासांपूर्वी तालिबानबरोबर चर्चा करणाऱ्या चीनने याबाबत अधिकृत स्तरावर घोषणा केलेली नाही. पण अफगाणिस्तानातील लिथिअमचे नियंत्रण मिळविण्यासाठी चीनने मोठी खेळी खेळल्याचा दावा केला जातो.

अफगाणिस्तानातील लिथिअमच्या खाणीत चीन मोठी गुंतवणूक करणार - १० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची तयारीअफगाणिस्तानमध्ये किमान एक ट्रिलियन डॉलर्सहून अधिक किंमतीचा लिथिअमचा साठा असल्याचे अमेरिका पाश्चिमात्य देशांचे म्हणणे आहे. या देशातील नुरीस्तान, कुनार या प्रांतांमध्ये मोठ्या संख्येने लिथिअम असल्याचे याआधीच्या सर्वेक्षणातून उघड झाले होते. येथील खडकांमध्ये ३० टक्के लिथिअम असल्याची माहिती समोर आली होती. हा लिथिअमचा साठा मिळविण्यासाठी याआधी अमेरिका तसेच युरोपिय देश व चीनने प्रयत्न केले होते. पण अफगाणिस्तानातील पाश्चिमात्य समर्थक तत्कालिन लोकशाही सरकारविरोधात तालिबानचा संघर्ष सुरू असल्यामुळे येथील लिथिअम व इतर खनिजसंपत्तीचे उत्खनन करणे अवघड बनले होते.

पण अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून चीनने थेट तालिबानबरोबरच या खनिजसंपत्तीच्या उत्खननासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत तालिबानचे नेते आणि चीनच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठका पार पडल्या आहेत. पण चीनच्या शर्तींवर खनिजसंपत्तीच्या उत्खननाला परवानगी देण्यास तालिबान तयार नसल्याचा दावा केला जातो. अफगाणिस्तानातील आपल्या राजवटीला मान्यता मिळवून देण्याच्या शर्तीबरोबर इतरही मागण्या तालिबानने चीनसमोर केल्या होत्या.

अफगाणिस्तानातील लिथिअमच्या खाणीत चीन मोठी गुंतवणूक करणार - १० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची तयारीअशा परिस्थितीत चीनमधील ‘गोचीन’ या खनिज उत्खननातील कंपनीने तालिबानबरोबर १० अब्ज डॉलर्सचा करार केल्याची बातमी अफगाणी वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या लिथिअमचे अफगाणिस्तानातील उत्खनन करुन चीन जागतिक पुरवठा साखळीतील आपले स्थान पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते. या मोबदल्यात चीन अफगाणिस्तानात भूयारीमार्ग, जलविद्युत प्रकल्प, धरणे, महामार्ग या पायाभूत सुविधा उभारून देणार असल्याचे सदर वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

पण तालिबानची राजवट चीनला इतक्या सहजासहजी लिथिअमच्या उत्खननासाठी परवानगी देणार नाही, असा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत. चीनचे नागरीक व अधिकाऱ्यांना बेकादेशीररित्या खनिजसंपत्तीच्या उत्खननाप्रकरणी तालिबानच्या राजवटीने ताब्यात घेतले होते. त्याचबरोबर चीनच्या काही अधिकाऱ्यांवर खनिजसंपत्तीच्या तस्करीचे गंभीर आरोपही झालेले आहेत. सुमारे १००० टन इतक्या वजनाचे लिथिअमच्या दगडांच्या तस्करीप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले होते, याकडे विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

हिंदी

 

leave a reply