तैवानच्या मुद्यावरून जपान व चीनमधील तणाव चिघळण्याचे संकेत

टोकिओ/बीजिंग – सेन्काकू आयलंड्स व हाँगकाँगवरून चीनविरोधात आक्रमक भूमिका घेणार्‍या जपानने आता तैवानच्या मुद्यावरही चीनला उघड आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच जपानने तैवानला कोरोनाच्या लक्षावधी लसी भेट दिल्या होत्या. त्यानंतर जपानच्या पंतप्रधानांनी संसदेत तैवानचा ‘देश’ म्हणून उल्लेख केल्याने चीन चांगलाच बिथरला आहे. त्यापाठोपाठ जपानच्या संसदेनेे तैवानला ‘वर्ल्ड हेल्थ असेंब्ली’त सहभागी करण्यासंदर्भातील ठराव बहुमताने मंजूर केल्याचे समोर आले आहे.

तैवानच्या मुद्यावरून जपान व चीनमधील तणाव चिघळण्याचे संकेतगेल्या काही वर्षात जपान व चीनमधील संबंधांमध्ये सातत्याने चढउतार सुरू असून सध्या तणाव वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. चीनकडून ईस्ट चायना सीमध्ये वारंवार सुरू असणारी घुसखोरी, कोरोनाच्या साथीबाबत केलेली लपवाछपवी, हाँगकाँगवर लादण्यात आलेला कायदा आणि आर्थिक व लष्करी सामर्थ्याच्या बळावर दडपण टाकण्याचे प्रयत्न या मुद्यांवर जपानने आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन देशांमध्ये यावरून सातत्याने शाब्दिक चकमकी व संघर्ष उडत असल्याचेही समोर येत आहे.

या तणावात तैवानच्या मुद्याचीही भर पडली असून जपानने अधिकाधिक ठाम भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोना साथीच्या सुरुवातीच्या काळात तैवानकडून घेण्यात आलेल्या भूमिकेला समर्थन करणार्‍या देशांमध्ये जपान आघाडीवर होता. जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी नुकताच संसदेत केलेले वक्तव्यही त्याला दुजोरा देणारा ठरला आहे. पंतप्रधान सुगा यांनी कोरोनाच्या काळात ज्या देशांनी साथ रोखण्यासाठी आक्रमक उपाययोजना केल्या त्यांची नावे घेताना ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडबरोबर तैवानचाही उल्लेख केला.तैवानच्या मुद्यावरून जपान व चीनमधील तणाव चिघळण्याचे संकेत

जपानच्या पंतप्रधानांनी तैवानचा देश म्हणून केलेला उल्लेख चीनला चांगलाच झोंबला आहे. ‘जपानने केलेल्या चुकीच्या वक्तव्यांवर चीन नाराज आहे. यासंदर्भातील अधिकृत तक्रारही जपानकडे नोंदविण्यात आली आहे. यापुढे जपानने तैवानच्या मुद्यावर बोलताना तसेच कृती करताना अधिक काळजी घ्यावी. जगात केवळ एकच चीन आहे’, या शब्दात चीनच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदविली. चीनच्या या प्रतिक्रियेनंतर जपानने या मुद्यावर खुलासा करून तैवानसंदर्भातील भूमिकेत बदल झालेला नाही, असे स्पष्ट केले. तैवानच्या मुद्यावरून जपान व चीनमधील तणाव चिघळण्याचे संकेतमात्र त्यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये जपानच्या संसदेने तैवानच्या ‘वर्ल्ड हेल्थ असेंब्ली’मधील समावेशाला संपूर्ण समर्थन देणारा ठराव मंजूर केला. या ठरावात, इतर देशांनीही तैवानला समर्थन देण्यासाठी जपान सरकारने प्रयत्न करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. तैवानच्या समर्थनार्थ जपानकडून एकामागोमाग उचलण्यात येणारी पावले चीनला अस्वस्थ करणारी ठरत आहेत.

काही दिवसांपूर्वी चीनने तैवानला समर्थन देणार्‍या ऑस्ट्रेलियाला आक्रमक शब्दात धमकावले होते. त्याच स्वरुपाची प्रतिक्रिया जपानबाबतही उमटण्याची शक्यता असून, त्यामुळे जपान व चीनमधील तणाव अधिकच चिघळेल असे संकेत विश्‍लेषकांकडून देण्यात येत आहेत.

leave a reply