तैवानला घेरणारा चीनचा युद्धसराव सुरू

बीजिंग – तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन आणि अमेरिकन संसदेचे सभापती केविन मॅकार्थी यांच्या भेटीमुळे अस्वस्थ झालेल्या चीनने थेट तैवानला घेरणारा युद्धसराव सुरू केला आहे. ‘युनायटेड शार्प स्वर्ड’ या युद्धसरावाच्या पहिल्याच दिवशी चीनची 42 लढाऊ विमाने आणि आठ गस्तीनौकांनी तैवानची ‘मीडियन लाईन’ ओलांडून तैवानसह अमेरिकेला इशारा दिला. त्याचबरोबर तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या अमेरिका भेटीचे आयोजन करणाऱ्या दोन अमेरिकी संघटनांवर चीनने निर्बंध जाहीर केले.

तैवानला घेरणारा चीनचा युद्धसराव सुरूआठवड्याभराचा अमेरिका आणि लॅटीन अमेरिकी देशांचा दौरा करून तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन शनिवारी मायदेशी दाखल झाल्या. त्याबरोबर लढाऊ विमाने आणि गस्तीनौका तैवानच्या मीडियन लाईनमध्ये रवाना करून चीनने तैवानच्या राष्ट्राध्यक्षांना धमकावले. तीन दिवसांच्या ‘युनायटेड शार्प स्वर्ड’ युद्धसरावाचा हा एक भाग असल्याचे चीनच्या माध्यमांनी स्पष्ट केले. आत्तापर्यंतचे चीनचे युद्धसराव तैवानच्या पश्चिम किंवा उत्तरेकडील सीमेपर्यंत मर्यादित होते. तैवानला घेरणारा चीनचा युद्धसराव सुरूतैवानला घेरून चीनच्या लष्कराने हा नवा युद्धसराव आयोजित केला आहे, अशी माहिती चीनच्या सरकारी माध्यमांनी दिली.

यामध्ये लांब पल्ल्याच्या तोफा, क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या नौका, बॉम्बर्स विमानांचादेखील समावेश असणार आहे. या सरावाच्या माध्यमातून चीनने तैवानला इशारा दिल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक व माध्यमे करीत आहेत. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने देखील चीनच्या हालचालींवर आपली बारीक नजर असल्याचे म्हटले आहे. तैवानला घेरणारा चीनचा युद्धसराव सुरू‘राष्ट्राध्यक्षा त्साई यांच्या अमेरिका भेटीचे कारण देऊन चीनने सुरू केलेल्या या युद्धसरावामुळे या क्षेत्रातील शांती, स्थैर्य आणि सुरक्षा बाधित झाली आहे. तेवानचे लष्कर योग्य वेळी या चिथावणीला उत्तर देईल’, असा इशारा तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिला.

दरम्यान, तैवानचा मुद्दा हा अमेरिका-चीन संबंधांमधील ‘फर्स्ट रेड लाईन’ असल्याचे बजावत पुढील काळात अमेरिकेला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी चीनने काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर चीनने तैवानच्या सागरी क्षेत्रात ‘शान्डाँग’ ही विमानवाहू युद्धनौकाही तैनात केली. पण तैवानला घेरणाऱ्या चीनच्या या आक्रमक लष्करी हालचालींविरोधात बायडेन प्रशासनाने प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.

हिंदी

 

leave a reply