युक्रेनमधील युद्ध थांबविण्यासाठी चीनने रशियावर दडपण आणावे

- चीनमधील अमेरिकी राजदूत निकोलस बर्न्स

बीजिंग/मॉस्को – रशियाने युक्रेनमधील युद्ध थांबवावे, यासाठी चीनने अधिक दडपण आणण्याची आवश्यकता असल्याचे अमेरिकी राजदूतांनी म्हटले आहे. चीनमधील अमेरिकी राजदूत निकोलस बर्न्स यांनी एका कार्यक्रमादरम्यान चीन व युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये झालेली चर्चा हे महत्त्वाचे पाऊल असल्याचेही सांगितले. काही महिन्यांपूर्वी चीनने रशिया-युक्रेनमधील संघर्षबंदी व शांतीचर्चेबाबत एक प्रस्ताव सादर केला होता. चीनच्या प्रस्तावाला युक्रेनसह पाश्चिमात्य देशांनी जोरदार विरोध दर्शविला होता.

युक्रेनमधील युद्ध थांबविण्यासाठी चीनने रशियावर दडपण आणावे - चीनमधील अमेरिकी राजदूत निकोलस बर्न्स‘रशियाने युक्रेनमधील आपली सगळी तैनाती मागे घ्यावी यासाठी चीनने रशियावर अधिक दबाव टाकायला हवा, असे अमेरिकेला वाटते. तसे झाले तर युक्रेनला त्याचा सर्व भूभाग ताब्यात मिळेल व तो खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा सार्वभौम देश बनेल’, असे वक्तव्य निकोलस बर्न्स यांनी केले. अमेरिकी अभ्यासगट ‘स्टिमसन सेंटर’च्या कार्यक्रमात बर्न्स यांनी आपली ही भूमिका मांडल्याचे समोर आले आहे.

‘रशियाला सल्ला देतान चीनने कठोर भूमिका स्वीकारायला हवी. युद्ध लवकरात लवकर संपेल यासाठी चीनने कृती करायला हवी. ही कृती व त्याचे परिणाम युक्रेन सरकारला मान्य असणेही गरजेचे आहे’, असे बर्न्स पुढे म्हणाले. यावेळी त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात झालेल्या चर्चेचेही स्वागत केले. युक्रेनमधील युद्ध थांबविण्यासाठी चीनने रशियावर दडपण आणावे - चीनमधील अमेरिकी राजदूत निकोलस बर्न्सहे पहिले व चांगले पाऊल ठरते, असा दावा अमेरिकी राजदूत बर्न्स यांनी केला.

बर्न्स यांच्या वक्तव्यापाठोपाठ अमेरिकेच संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनीही वर्ष अथवा दोन वर्षात रशिया-युक्रेनमध्ये वाटाघाटी होण्याची शक्यता आहे, असे म्हंटले आहे. युक्रेनच्या संभाव्य प्रतिहल्ल्यांच्या मोहिमेचा निकाल कोणत्याही बाजूने लागू शकतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तर अमेरिकेतील संसद सदस्य व वरिष्ठ नेते मायकल मॅकॉल यांनी, प्रतिहल्ल्यांच्या मोहिमेतील परिणामांवर युक्रेनला पुढे अर्थसहाय्य चालू ठेवायचे की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, याची जाणीव करून दिली.

युक्रेनकडून सुरू असलेल्या हल्ल्यांच्या मुद्यावरून अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. अमेरिकेसह युरोपिय वर्तुळातील अनेक नेते, अधिकारी तसेच विश्लेषक युक्रेनच्या निर्णयांवर नाखूष असून काहींनी याबाबत उघड वक्तव्ये करण्यासही सुरुवात केली आहे.

हिंदी

 

leave a reply